
मायक्रोसॉफ्टचे भारतीय वंशाचे सीईओ सत्या नडेला यांना लॉटरी लागली आहे. त्यांची दिवाळी यंदा धमाकेदार होणार आहे. कंपनीने त्यांच्या पगारात घसघशीत वाढ केली आहे. गेल्या वर्षीपेक्षा त्यांच्या वेतनात 63 टक्क्यांची वाढ झाली आहे.

सत्या नडेला यांना वेतन आणि अनुषांगिक भत्ते, बोनस मिळून एकूण 79.1 मिलियन डॉलर ( 670 कोटी रुपये) मिळतील. वर्ष 2023 च्या तुलनेत हा आकडा 63 टक्के अधिक आहे.

2014 मध्ये त्यांनी या कंपनीत प्रवेश केल्यावर त्यांना 79.1 मिलियन डॉलर कम्पंसेशन (Compensation) देण्यात आले होते. मायक्रोसॉफ्टचे सीईओ झाल्यावर त्यांना 84 मिलियन डॉलर वेतन देण्यात आले होते.

सत्या यांच्या वेतनात मोठा वाटा हा त्यांचा कामाकाजातील चोख कामगिरीचा ( Performance Based Stock Awards) आहे. त्याचे मूल्य 2024 मध्ये 71.2 मिलियन डॉलर होते. गेल्या वर्षी हा आकडा 39 मिलियन डॉलरच्या घरात होता.

या वर्षात 2024 मध्ये मायक्रोसॉफ्टचा शेअर 28 टक्क्यांनी उसळला. गुरूवारी कंपनीचा शेअर उसळला. 24 ऑक्टोबर 2024 रोजी कंपनीचे मार्केट कॅप वाढून 3.6 ट्रिलियन डॉलरवर पोहचले.

सत्या नडेला यांना 2024 मध्ये मिळणाऱ्या एकूण वेतनात 2.5 मिलियन डॉलर हा पगाराचा भाग आहे. गेल्या वर्षी पण हा आकडा असाच होता. त्यांनी कॅश बोनस कमी करण्याची विनंती कंपनीकडे केली होती. ती मान्य करण्यात आली.