
बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांच्यासोबत चित्रपटांमध्ये किंवा इतर ठिकाणी छेडछाड झाल्याच्या घटना समोर येत आहेत. अशातच आता आणखी एका अभिनेत्रीसोबत गोव्यामध्ये फोटोशूट करताना छेडछाड झाल्याची घटना समोर आली आहे.

बॉलिवूडची ही अभिनेत्री आज तिचा 41 वा वाढदिवस साजरा करत आहे. या अभिनेत्रीचे नाव मिनिषा लांबा आहे. सोशल मीडियावर तिचे चाहते आणि मित्रमंडळी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.

दरम्यान, या अभिनेत्रीने एका मुलाखतीत सांगितले होते की, एकदा फोटोशूटसाठी ती गोव्याला गेली असताना तिच्यासोबत गैरवर्तन केल्याचा प्रकार घडला. ज्यामध्ये काही लोकांनी तिला वेगळ्या पद्धतीने स्पर्श केला होता.

या घटनेमुळे ती प्रचंड घाबरून गेली होती आणि हा अनुभव तिच्यासाठी अत्यंत त्रासदायक ठरला होता. मिनिषा लांबा हिने 2015 साली उद्योगपती रयान थाम यांच्याशी लग्न केले होते. मात्र, हे नाते फार काळ टिकू शकले नाही. अवघ्या पाच वर्षांनंतर 2020 साली दोघांचा घटस्फोट झाला.

आज वाढदिवसाच्या निमित्ताने मिनिषा लांबा पुन्हा एकदा चर्चेत आली असून, तिच्या आयुष्यातील चढ-उतार, करिअरमधील संघर्ष आणि वैयक्तिक अनुभवांमुळे ती कायमच चर्चेचा विषय ठरली आहे. तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.