
बॉलिवुडचं जग हे मोठं गुढ आहे. इथे रोज अनेक कलाकार येतात. काही कलाकारांचा चांगला जम बसतो. तर काही कलाकारांच्या नशिबी फक्त निराशा येते. त्यामुळे करिअर सुरु झाल्यानंतर अवघ्या काही वर्षांत या लोकांचे नशीब संपते. सध्या अशाच एका अभिनेत्रीची चर्चा सगळीकडे होत आहे.

या अभिनेत्रीचे नाव मिनिषा लांबा असे आहे. तिने आपल्या अभिनयाच्या करिअरला 2005 साली सुरुवात केली. विशेष म्हणजे रणबीर कपूर यासारख्या बड्या अभिनेत्यांसोबत तिने काम केलेले आहे. याच अभिनेत्रीला दिग्दर्शकाने थेट कनशिलात लगावली होती. तिच्या वैयक्तिक आयुष्यातही मोठे चढउतार पाहायला मिळाले.

मिनिषा लांबाचा 2005 साली 'यहाँ' नावाचा पहिला चित्रपट आला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारची चांगली कामगिरी करू शकला नाही. त्यानंतर 2006 साली तिचा कॉर्पोरेट नवाचा चित्रपट आला. 2007 साली हनीमून ट्रॅव्हल्स प्रायव्हेट लिमिटेड नावाचा चित्रपा आला. 2009 साली तिचा रणबीर कपूरसोबत बचना ए हसीनों हा चित्रपट आला.

मिनिषाने दिग्दर्शकाने तिच्या कानशीलात का लगावली होती, याबाबतचा एक किस्सा सांगितला आहे. एका मुलाखतीत बोलताना तिने सांगितले की, मला एका चित्रपटाच्या सीनमध्ये रडण्याचा सीन करायचा होता. या सीनमध्ये मला रडायलाच येत नव्हते. मग मीच शूजित सरकार या दिग्दर्शकाकडे गेले आणि त्याला कानशिलात लावण्यास सांगितले. त्यानंतर मला रडू आले आणि मी तो सीन शूट केला.

या अभिनेत्रीच्या वैयक्तिक आयुष्यातही मोठे-चढउतार पाहायला मिळाले. तिने 6 जून 2015 रोजी हॉटेल व्यावसायिक रयान थाम यांच्याशी लग्न केले. परंतु पाच वर्षांनी त्यांचे लग्न मोडले. 2020 साल मिनिषाने रयान यांच्यासोबत घटस्फोट घेतला.