प्रचंड बोल्ड आहे ‘मिर्झापूर’मधील मुन्ना भैय्याची पत्नी, एका रात्रीत बनलेली ‘नॅशनल क्रश’, शेवटचा फोटो…

'मिर्झापूर'सीरिजमध्ये मुन्ना भैय्याच्या पत्नीची भूमिका साकारणारी अभिनेत्री ईशा तलवार आहे खूपच बोल्ड. शेवटच्या फोटोवरून हटणार नाही नजर.

| Updated on: Feb 06, 2026 | 12:46 PM
1 / 6
अमेझॉन प्राइमवरील गाजलेल्या वेब सीरिज ‘मिर्झापूर’ मधून माधुरी यादव ही भूमिका साकारणारी अभिनेत्री ईशा तलवार अवघ्या रातोरात देशभरात चर्चेत आली. या भूमिकेमुळे ती प्रेक्षकांची लाडकी ठरली आणि ‘नॅशनल क्रश’ म्हणून ओळखली जाऊ लागली.

2 / 6
‘मिर्झापूर 2’ मध्ये मुन्ना भैय्या म्हणजेच दिव्येंदू शर्मासोबत ईशाची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड भावली होती. तिच्या साध्या, सशक्त आणि वास्तवदर्शी अभिनयामुळे माधुरी यादव हे पात्र विशेष गाजले. या भूमिकेमुळे ईशाला घराघरात ओळख मिळाली आणि तिच्या कारकिर्दीला खऱ्या अर्थाने नवी दिशा मिळाली.

3 / 6
मात्र ‘मिर्झापूर’ हा ईशा तलवारचा पहिला प्रोजेक्ट नव्हता. याआधी तिने बॉलिवूडमध्ये सलमान खानच्या ‘ट्यूबलाइट’ या चित्रपटात काम केले होते. तरीही त्या चित्रपटातून तिला अपेक्षित अशी ओळख मिळू शकली नव्हती. अभिनयाची गुणवत्ता असूनही मोठा ब्रेक मिळण्यासाठी तिला काही काळ वाट पाहावी लागली.

4 / 6
आपल्या कारकिर्दीत ईशा तलवारने अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केले आहे. बहुभाषिक चित्रपटांतील तिच्या कामगिरीसाठी ईशाला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

5 / 6
‘मिर्झापूर’नंतर ईशा तलवारला रोहित शेट्टी यांच्या दिग्दर्शनाखालील वेब सीरिज ‘इंडियन पोलिस फोर्स’ मध्ये पाहायला मिळाले. या सीरिजमध्ये तिने अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राच्या अपोजिट महत्त्वाची भूमिका साकारली होती, ज्यामुळे तिच्या अभिनयाचा आणखी एक वेगळा पैलू प्रेक्षकांसमोर आला.

6 / 6
याशिवाय अलीकडेच ईशा तलवार नेटफ्लिक्सवरील कॉमिक वेब सीरिज ‘सिंगल पापा’ मध्येही झळकली. या हलक्याफुलक्या आणि मनोरंजक भूमिकेमध्येही तिने आपल्या अभिनयाची छाप पाडली असून ओटीटी विश्वातील तिचे स्थान अधिक भक्कम केले आहे.