
वर्ष 1999 मध्ये युक्ता मुखीने भारतासाठी मिस वर्ल्डचा किताब जिंकला. त्यानंतर ती सर्वत्र लोकप्रिय झाली. चित्रपट सृष्टीत अभिनेत्री म्हणून आली. युक्ताला फिल्मी करिअरमध्ये तितकं यश मिळालं नाही, जितकं अपेक्षित होतं. तिचं 6 वर्षाच फिल्मी करिअर फ्लॉप ठरलं. वर्ष 2002 मध्ये 'प्यासा' चित्रपटातून तिने डेब्यु केलेला. (instagram @bollyfusion)

युक्ता अनेक प्रादेशिक भाषांच्या चित्रपटात दिसली. पण ते यश तिला मिळालं नाही. चित्रपटांमध्ये जास्त संधी मिळाली नाही, त्यानंतर ती आता लाइमलाइटपासून खूप दूर गेलीय. अलीकडेच युक्ता बॉलिवूडमधल्या तिच्या संपूर्ण प्रवासाबद्दल व्यक्त झाली. मिस वर्ल्ड झाल्यानंतर इंडस्ट्रीमध्ये प्रवेश अचानक झाला. तिला चित्रपटांबद्दल काही आयडिया नव्हती. तिला सगळं काही शिकावं लागलं. यात खूप अडचणी आल्या. (instagram @rj ranjit world)

युक्ताने सांगितलं की, तिला चित्रपटांचा काहीच अनुभव नव्हता. अभिनयाची थोडीबहुत आवड होती. पण मिस वर्ल्ड बनेपर्यंत यात करिअर करण्याचा माझा कुठला प्लान नव्हता. मला संधी मिळाल्यानंतर बरीच ट्रेनिंग घ्यावी लागली. डान्स, डायलॉग डिलीवरी आणि अभिनय शिकावा लागला. चित्रपट सृष्टीत मला योग्य वागणूक मिळाली नाही, असं तिने सांगितलं. (instagram @bollyfusion)

मी इतक्या कमी वयात एवढ यश मिळवलय यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. ते मला खाली खेचण्याचा प्रयत्न करायचे. सेटवर माझ्या कामाच योग्य पद्धतीने कौतुक झालं नाही. मी जे काही करायची, त्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जायचं. मी एक नवीन अभिनेत्री होते, तरी सपोर्ट मिळाला नाही, असं युक्ताने सांगितलं. (instagram @nippon hidalgo)

लोक जे बोलले ते मी आव्हान म्हणून घेतलं. पण विषय जेव्हा आत्मसन्मानावर आला, त्यावेळी चित्रपटसृष्टी सोडण्याचा तिने निर्णय घेतला. तिचं व्यक्तीगत आयुष्यही फार चांगलं राहिलं नाही. तिचं प्रिन्स तुली बरोबर लग्न झालेलं. पण 2014 साली त्यांचा घटस्फोट झाला. तिने पती आणि सासरच्या माणसांवर घरगुती हिंसाचाराचा आरोप केलेला. (instagram @thepageantglitzrld)