Krait Snake : हा साप म्हणजे चलता-फिरता मृत्यू, रात्रीच्या अंधारात अंगावर बसतो अन्…

या सापाने एकदा चावा घेतला की समोरच्या व्यक्तीला एखादी मुंगी चावल्यासारखे वाटते. त्यामुळे आपल्याला साप चावलेला आहे, हे अनेकांना समजतही नाही. त्यामुळेच या सापाला सायलेंट किलर म्हटले जाते.

| Updated on: Sep 13, 2025 | 3:21 PM
1 / 7
साप हा असा सरपटणारा प्राणी आहे, ज्याला बहुसंख्य लोक घाबरतात. काही सापांनी दंश केल्यावर लगेच माणसाचा मृत्यू होतो. तर काही साप हे बिनविषारी असतात. सध्या मात्र एका सायलेंट किलर सापाची सगळीकडेच चर्चा होत आहे. हा साप रात्री लोकांना दंश करतो.

2 / 7
हा साप उत्तरेत आढळत असून या सापाला क्रेट साप असे म्हटले जाते. या सापाचे विष एकदा माणसाच्या अंगात गेले की मृत्यू अटळ असल्याचे मानले जाते. कारण विंध्य प्रदेशात हा साप गेल्या चार महिन्यांत 12 जणांना चावला आहे. विशेष म्हणजे 12 जणांपैकी 10 जणांचा मृत्यू झाला आहे.

3 / 7
फक्त मेहर क्षेत्रात आतापर्यंत पाच जणांना हा साप चावल्यामुळे प्राण गमवावे लागले आहेत. या सापाला सायलेंट किलर म्हटले जाते. हा साप एवढा विषारी का असतो, याबाबत सर्पमित्र विवेक तिवारी यांनी सांगितेल असून सविस्तर वृत्त न्यूज 18 हिंदीने दिले आहे.  हा साप लोकांना विशेषत: रात्री चावतो.

4 / 7
माणूस जेवा झोपेत असतो तेव्हा तो अंथरूणात शिरतो. कधीकधी हा साप झोपलेल्या लोकांच्या अंगावरही चढतो. झोपेत असलेल्या व्यक्तीने कुस बदलताच तो लगेच चावा घेतो.

5 / 7
या सापाने एकदा चावा घेतला की समोरच्या व्यक्तीला एखादी मुंगी चावल्यासारखे वाटते. त्यामुळे आपल्याला साप चावलेला आहे, हे अनेकांना समजतही नाही. त्यामुळेच या सापाला सायलेंट किलर म्हटले जाते. हा साप चावल्यानंतर साधारण अर्ध्या तासांनी लक्षणे दिसायला लागतात.

6 / 7
अगोदर चावलेल्या ठिकाणी आग होते. त्यानंतर उलटी, चक्की येणे, पोटात दुखायला लागणे, घबराट होणे अशी लक्षणं दिसतात. हा साप साधारण दोन ते दीड फुट लांब असतो. या सापाचा रंग काळा असतो. त्याच्या अंगावर पांढऱ्या रंगाच्या रेषाही असतात.

7 / 7
दरम्यान, हा साप विषारी असला तरी वेळेवर उपचार मिळाल्यास रुग्णाचा जीव वाचतो. हा साप विषारी असला तरी इतर काही साप मात्र विषारी नसतात. त्यामुळे घाबरून न जाता सर्पमित्रांची मदत घ्यावी.  (टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)