
अनिल कुंबळेने भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या यादीमध्ये कुंंबळे एक नंबरला असून त्याने 963 विकेट घेतल्या आहेत.

दुसऱ्या स्थानी टीम इंडियाचा स्टार खेळाडू हरभजन सिंह असून त्याने 707 विकेट घेतल्या आहेत.

तिसऱ्या स्थानी अश्विन असून त्याने अवघ्या 217 सामन्यांमध्ये 702 विकेट्स घेतल्या आहे. वेस्ट इंडिजविरूद्धच्या मालिकेत त्याला दुसऱ्या स्थानी जाण्याची संधी आहे.

भारताला पहिला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या संघाचा कर्णधार कपिल देव चौथ्या स्थानी आहे. वेगवान गोलंदाजांपैकी कपिल देवने 687 विकेट्स घेतल्या आहेत.

या यादीमध्ये पाचव्या स्थानी झहीर खान असून त्याने 597 विकेट्स घेतल्या आहेत.