
हातात तिरंगा घेवून ही व्यक्ती झाडावर चढली आहे. व्यक्तीची समज घाल्याचा प्रयत्न अग्निशमन दलाकडून सुरु आहे. तुम्ही खाली या आपण चर्चा करु... असं सांगण्यात आलं आहे. मात्र व्यक्ती आंदोलनावर ठाम आहे.

व्यक्तीला खाली उतरवण्याचे अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. सेंद्रीय मॉलच्या संकल्पनेसाठी व्यक्तीचं आंदोलन सुरु आहे.

सेंद्रीय मॉलच्या संकल्पचं बॅनर घेऊन व्यक्तीने आंदोलन सुरु ठेवलं आहे. 'मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आपण झाडावरुन खाली उतरणार नाही...' असा पावित्रा व्यक्तीने घेतला आहे.

दोन अग्निशमन दलाचे जवान शिडीच्या सहाय्याने झाडावर चढले आहेत. जवान व्यक्तीला खाली उतरवण्याचा प्रयत्न करत आहेत. व्यक्तीला समजवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून देखील सुरू आहे. पण व्यक्ती झाडावर आणखी वर जाऊन बसली आहे.

व्यक्ती झाडाच्या टोकावर असल्यामुळे धक्कादायक घटना घडू शकते अशी देखील भीती सध्या वर्तवण्यात येत आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त घटना स्थळी दाखल झाला आहे.