Omraje Nimbalkar: सोयाबीन पिकांचे नुकसान झाल्यामुळे ओमराजे निंबाळकर यांचा मोठा निर्णय, थेट शेतकऱ्याच्या…

Omraje Nimbalkar: कळंब तालुक्यातील येरमाळा, बागरवाडी, हासेगाव केज, हावरगाव आणि खोदला गावांमधील शेतकऱ्यांना ओमराजे निंबाळकर यांनी थेट भेट दिली. त्यांनी नुकसानीची पाहणी करण्यासाठी थेट शेतकऱ्याच्या बांधावर जाण्याचा निर्णय घेतला.

| Updated on: Sep 06, 2026 | 9:31 AM
1 / 5
राज्यात पावसाने चांगलीच दांडी मारल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी रिमझिप पाऊस पडत आहे तर काही ठिकाणी पाऊस गायब झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचे दिसत आहे.

राज्यात पावसाने चांगलीच दांडी मारल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी रिमझिप पाऊस पडत आहे तर काही ठिकाणी पाऊस गायब झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचे दिसत आहे.

2 / 5

कळंब तालुक्यात पावसाअभावी सोयाबीन पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. करपत चाललेल्या सोयाबीन पिकांमुळे शेतकऱ्यांचे टेन्शन प्रचंड वाढले आहे. अशा परिस्थितीत काय करावे आणि काय करु नये असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

3 / 5

दरम्यान, खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मोठा निर्णय घेतला. त्यांनी थेट कळंब तालुक्यातील सोयाबीन शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली.

4 / 5

येरमाळा, बागरवाडी, हासेगाव केज, हावरगाव आणि खोदला या गावांना भेट देत त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.

5 / 5

परिस्थिती भीषण असून सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी, अशी मागणी निंबाळकर यांनी केली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us