ट्रॉफींनी सजलेलं घर, डोक्यात पुस्तकं अन् ओठांवर परखड शब्द; MPSC आंदोलन गजावणाऱ्या विवेकानंद पाटीलचं घर पाहिलंत का?

MPSC आंदोलनाने चर्चेत आलेले विवेकानंद पाटील हाँ कोल्हापूरच्या माजगावचा शेतकरी पुत्र आहे. आपल्या रांगड्या आणि अभ्यासपूर्ण वक्तृत्वाने त्याने हजारो विद्यार्थ्यांचे लक्ष वेधले. साध्या घरातून आलेल्या विवेकानंदने वाचन व वक्तृत्वाची आवड जोपासली. तो आज MPSC विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना बुलंद आवाज देत तरुणाईला प्रेरित करत आहे.

| Updated on: Oct 06, 2026 | 3:48 PM
1 / 8
“MPSC चे पेपर फुटले, आता बालवाडीचे पेपर फुटायची वेळ येऊ देऊ नका!”  या एका वाक्याने विवेकानंद पाटीलचं नाव चर्चेत आलं. पुण्यात सुरू असलेल्या MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनात आपल्या रांगड्या भाषेत, अभ्यासपूर्ण मांडणीत आणि परखड वक्तृत्वाने त्याने हजारो विद्यार्थ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला राज ठाकरे, सुप्रिया सुळे, ओमराजे निंबाळकर, विश्वजीत कदम यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेट दिली. मात्र या नेत्यांसमोरही विवेकानंदने विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर बेधडक भूमिका मांडली.

“MPSC चे पेपर फुटले, आता बालवाडीचे पेपर फुटायची वेळ येऊ देऊ नका!” या एका वाक्याने विवेकानंद पाटीलचं नाव चर्चेत आलं. पुण्यात सुरू असलेल्या MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनात आपल्या रांगड्या भाषेत, अभ्यासपूर्ण मांडणीत आणि परखड वक्तृत्वाने त्याने हजारो विद्यार्थ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला राज ठाकरे, सुप्रिया सुळे, ओमराजे निंबाळकर, विश्वजीत कदम यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेट दिली. मात्र या नेत्यांसमोरही विवेकानंदने विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर बेधडक भूमिका मांडली.

2 / 8

विवेकानंद पाटील हा कोल्हापूर जिल्ह्यातील माजगाव या छोट्याशा गावचा. अवघ्या 24 वर्षांचा विवेकानंद सध्या पुण्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहे. विवेकानंदचे आई-वडील शेती करतात. मर्यादित साधनं, साधं घर आणि गावाकडचं वातावरण; मात्र याच परिस्थितीत विवेकानंदने वाचन आणि वक्तृत्वाची आवड जोपासली.

3 / 8

माजगावमधील विवेकानंदचं घर अगदी साधं आहे. मातीचं घर, घरातली साधी राहणी... पण याच घरात नजर जाते ती एका वेगळ्याच गोष्टीकडे—ट्रॉफी, सन्मानचिन्हं आणि वक्तृत्व स्पर्धांमध्ये मिळवलेल्या बक्षिसांची.

4 / 8

घरात मांडलेल्या या ट्रॉफी केवळ पुरस्कार नाहीत. त्या विवेकानंदच्या मेहनतीची, वक्तृत्वाची आणि लहानपणापासूनच्या संघर्षाची साक्ष देतात. याच छोट्याशा घरात बसून विवेकानंदने पुस्तकं वाचली. वाचनातून विचारांची शिदोरी मिळाली आणि वक्तृत्वातून ते विचार मांडण्याची ताकद मिळाली.

5 / 8

वाचनातून मिळालेला संदर्भ आणि कोल्हापूरच्या मातीतून आलेली रांगडी भाषा, यांचा अनोखा मिलाफ विवेकानंदच्या भाषणात दिसतो. त्यामुळे त्याचे शब्द थेट विद्यार्थ्यांच्या मनाला भिडतात. छोट्याशा माजगावातून सुरू झालेला विवेकानंदचा प्रवास आज पुण्याच्या आंदोलनापर्यंत पोहोचला आहे. सरकार असो किंवा आयोग—विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर तो थेट सवाल करताना दिसतो.

6 / 8

पुण्याच्या रस्त्यावर हजारो विद्यार्थ्यांसमोर विवेकानंदचा बुलंद आवाज घुमतोय. त्याच्या भाषणातून विद्यार्थ्यांच्या मनातील अस्वस्थता, संताप आणि अपेक्षा व्यक्त होत आहेत.एकीकडे साधं पत्र्याचं घर, शेती करणारे आई-वडील आणि घरभर मांडलेल्या ट्रॉफी; तर दुसरीकडे पुण्याच्या रस्त्यावर हजारो विद्यार्थ्यांसमोर घुमणारा आवाज.

7 / 8

ज्या घरात त्याने पुस्तकं वाचली, वक्तृत्वाची तयारी केली आणि बक्षिसं मिळवली, त्याच घरातून तयार झालेला हा तरुण आज हजारो विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना शब्द देतोय. रांगडी भाषा, अभ्यासपूर्ण मांडणी आणि परखड भूमिका यामुळे विवेकानंद पाटील सध्या महाराष्ट्रभर चर्चेत आहे. MPSC आंदोलनातील त्याचा आवाज तरुणाईमध्येही विशेष चर्चेचा विषय ठरतोय.

8 / 8

माजगावच्या छोट्याशा घरातून पुण्याच्या आंदोलनापर्यंत पोहोचलेला विवेकानंदचा प्रवास एका गोष्टीची जाणीव करून देतो—परिस्थिती साधी असली, तरी स्वप्नं आणि आवाज मोठा असू शकतो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us