घाटकोपर स्थानकात नवा एलिव्हेटेड डेक, दक्षिणदिशेकडील पादचारी पुलाचे लोकार्पण
मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड नुकताच गर्दीच्या घाटकोपर रेल्वे स्थानकात एलिवेटेड डेक बांधला आहे. या एलिवेटेड डेकला दक्षिण दिशेला १२ मीटर रुंद आणि ६५ मीटर लांबीचा पादचारी पुल जोडण्यात आला आहे.

घाटकोपर स्थानक येथे घाटकोपर ते वर्सोवा मुंबई मेट्रो मार्गिक वनच्यामुळे मध्य रेल्वे आणि मेट्रोच्या प्रवाशांची अदलाबदल होत असते. त्यामुळे दक्षिण दिशेला नवा पादचारी पुलासह एलिवेटेड डेक उभारण्यात आल्याने गर्दीचे विभाजन होणार आहे. तसेच प्रवाशांचे स्थानकातील आगमन आणि निर्गमन सोपे होणार आहे.

घाटकोपर स्थानकात ५५.० मीटर लांबीचा एलिवेटेड डेक नुकताच सुरु झाला आहे. हा एलिवेटेड डेक सध्याच्या मेट्रो पादचारी पुलासह दक्षिण दिशेच्या पादचारी पुलाला कनेक्ट असल्याने प्रवाशांना फायदा होणार आहे. या एलिवेटेड डेकला मेट्रो एफओबीशी ४.० मीटरचा कनेक्शन दिले आहे तर ७.५ मीटरचा जोड रस्ता नव्या दक्षिण दिशेच्या पादचारी पुलाला दिला आहे.

मेट्रो स्टेशन इमारतीत जाण्यासाठी ६.१० मीटर रुंदीच्या पायऱ्या या नव्या एलिवेटेड डेकला देण्यात आल्या आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेच्या प्रवाशांना थेट मुंबई मेट्रो वनकडे जाताना सोपा मार्ग उपलब्ध होणार आहे.

या एलिवेटेड डेकचा एक भाग असलेला १२.० मीटर रुंदीचा दक्षिण बाजूकडील पादचारी पूल (FOB ) घाटकोपर रेल्वे प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी अतिरिक्त मार्ग उपलब्ध करून देत आहे. तो'एलिव्हेटेड डेक'ला पूरक आहे. त्यामुळे घाटकोर रेल्वे स्थानकाची प्रवाशांना हाताळण्याची एकूण क्षमता लक्षणीयरीत्या वाढणार आहे.

उपनगरीय लोकलची अखंडित वाहतूक आणि प्रवाशांची येजा कायम असतानाही तसेच जागेची अडचण आणि कामाची अंमलबजावणी करण्याची गरज लक्षात घेऊन, दक्षिणेकडील FOB ला दोन टप्प्यांत बांधण्यात येत आहे.

पहिल्या टप्प्यात प्लॅटफॉर्म क्रमाक १ ला पायऱ्या जोडण्यात आल्या आहेत. प्लॅटफॉर्म क्रमांक 2/3 आणि Platform 4 ला डबल डिस्चार्ज लँडींगची सुविधा देण्यात आली आहे. नवीन बांधलेल्या एलिवेटेड टेक दक्षिणेकडील पादचारी पुलाला सध्या मेट्रोच्या पादचारी पुलाला जोडण्यात आला आहे. तसेच यामुळे सध्याच्या इस्टर्न स्काय वॉकशी जोड रस्ता देण्यात आला आहे.