
आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक म्हणून रिलायन्स ग्रुपचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्याकडे पाहिले जाते. अंबानी कुटुंबाच्या लाईफस्टाईलबद्दल जाणून घेण्यात अनेकांना रस असतो. पण त्यांच्या यशामागील रहस्य काय आहे, हे जाणून घेण्यात अनेकांना रस असतो.

आता नुकतंच मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी यांनी एका मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी वडील मुकेश अंबानी यांच्या एका सवयीबद्दल खुलासा केला आहे.

मुकेश अंबानी हे नेहमीच त्यांच्या ध्येयाबद्दल प्रामाणिक असतात. ते ज्या गोष्टी घडल्याच नाहीत किंवा भूतकाळात होऊन गेल्या, त्यांचा जास्त विचार करत नाहीत. याउलट ते नेहमी भविष्याचा विचार करतात, असे आकाश अंबानी म्हणाले आहेत.

त्यांच्या यशाचा सर्वात मोठा मंत्र हा आहे की, ते ज्या गोष्टी घडल्याच नाहीत किंवा भूतकाळात होऊन गेल्या, त्यांचा विचार करत बसत नाहीत. याऐवजी, ते नेहमी भविष्याचा विचार करण्यावर विश्वास ठेवतात. याच विचारधारेमुळे वयाच्या ६८ व्या वर्षीही ते भारतीय उद्योगात सक्रिय आहेत, असे आकाश अंबानी यांनी म्हटले.

माझे वडील माझ्यासाठी सर्वात मोठे प्रेरणास्थान आहेत. ते आपले काम आणि कुटुंब या दोन्ही गोष्टी अगदी योग्य पद्धतीने सांभाळतात. यामुळेच ते भारतीय उद्योगात सक्रिय आहेत, असेही आकाश अंबानी म्हणाले.

आकाश अंबानी यांच्या माहितीनुसार, मुकेश अंबानी पहाटे २ वाजेपर्यंत झोपत नाहीत. गेल्या ४० वर्षांपासून ते हा नियम पाळत आहेत. विशेष म्हणजे झोपण्यापूर्वी ते नियमितपणे एक नियम पाळतात.

मुकेश अंबानी ही त्यांच्या जीमेलवर येणारे प्रत्येक ईमेल स्वतः वाचतात आणि त्यावर उत्तर देतात. त्यांचे वेळापत्रक कितीही व्यस्त असेल किंवा ते कितीही थकलेले असले तरीही मेल पूर्ण पाहून त्याला रिप्लाय केल्याशिवाय ते झोपण्यासाठी जात नाहीत, अशी माहिती आकाश अंबानी यांनी दिली.

दरम्यान मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती सध्या १०७.३ अब्ज डॉलर्स असून, फोर्ब्सच्या यादीनुसार ते जगातील १६ व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत.