‘मुळशी पॅटर्न’ फेम अभिनेत्रीच्या घरी लवकरच येणार चिमुकला पाहुणा; पतीसोबत शेअर केले प्रेग्नन्सीचे खास फोटो

'मुळशी पॅटर्न'मधील चहावालीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मालविका गायकवाड लवकरच आई होणार आहे. अभिनेत्रीने पती सिद्धार्थ सिंघवीसोबत काही खास फोटो शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. तिच्या या फोटोंवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

| Updated on: Nov 23, 2026 | 8:31 AM
1 / 5
मराठी मनोरंजन विश्वातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. 'मुळशी पॅटर्न' या गाजलेल्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करणारी अभिनेत्री मालविका गायकवाड लवकरच आई होणार आहे. मालविकाने सोशल मीडियावर पती सिद्धार्थ सिंघवीसोबत काही सुंदर फोटो शेअर करत आपल्या आयुष्यात येणाऱ्या नव्या पाहुण्याची गोड बातमी चाहत्यांना दिली आहे. तिच्या या फोटोंची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

2 / 5

मालविका गायकवाड हिने 'मुळशी पॅटर्न' या चित्रपटात चहावालीची भूमिका साकारली होती. अभिनेता ओम भुतकर, मोहन जोशी आणि उपेंद्र लिमये यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटातील तिची भूमिका छोटी असली तरी ती प्रेक्षकांच्या लक्षात राहिली. विशेषतः राहुल्याची मैत्रीण आणि चहाची टपरी चालवणारी मुलगी म्हणून मालविकाने आपली वेगळी ओळख निर्माण केली.

3 / 5

मालविकाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती ग्रीन रंगाच्या सुंदर ड्रेसमध्ये दिसत आहे. या फोटोंमध्ये ती आपला बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसते. तिच्यासोबत पती सिद्धार्थ सिंघवीदेखील आहे. दोघांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि एकमेकांसोबतचे खास क्षण या फोटोंमधून पाहायला मिळत आहेत.

4 / 5

या फोटोंना मालविकाने दिलेलं कॅप्शनही विशेष लक्षवेधी आहे. 'एका वर्षानंतर, तीच जागा, तोच ड्रेस आणि थोडं अधिक प्रेम', अशा आशयाचं कॅप्शन तिने दिलं आहे. तिच्या या शब्दांमधून आयुष्यात येणाऱ्या नव्या आनंदाची झलक पाहायला मिळते. तिच्या या पोस्टनंतर चाहत्यांसह मनोरंजन विश्वातील अनेकांकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत.

5 / 5

मालविका गायकवाड हिने 2020 मध्ये सिद्धार्थ सिंघवीसोबत लग्नगाठ बांधली होती. लग्नानंतरही ती सोशल मीडियावर सक्रिय असून आपल्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक खास क्षण चाहत्यांसोबत शेअर करत असते. आता लग्नाच्या काही वर्षांनंतर त्यांच्या आयुष्यात नव्या सदस्याचं आगमन होणार आहे. त्यामुळे मालविकाच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी ठरली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us