Multibagger Stock: गुंतवणूकदारांची पाचही बोटं तुपात! या शेअरने केले मालामाल, आता बोनस शेअर वाटणार

Bonus Share: अवेक्स अपरेल्स या कंपनीच्या शेअरने गेल्या 7 महिन्यात 235 टक्क्यांची उसळी घेतली. आता ही कंपनी गुंतवणूकदारांना 3 बोनस शेअरचे गिफ्ट देणार आहे. गुंतवणूकदार यामुळे मालामाल होणार आहेत.

| Updated on: Apr 03, 2026 | 5:19 PM
1 / 6
Share Market: छोटी कंपनी अवेक्स अपरेल्स अँड अर्नामेंट्सने शेअरधारकांना मोठे गिफ्ट दिले आहे. ही कंपनी गुंतवणूकदारांना बोनस शेअर देणार आहे. कंपनीने 3:1 प्रमाणात बोनस शेअर देण्याचे जाहीर केले आहे. कंपनी एका शेअरवर 3 शेअर मोफत देणार आहे.

Share Market: छोटी कंपनी अवेक्स अपरेल्स अँड अर्नामेंट्सने शेअरधारकांना मोठे गिफ्ट दिले आहे. ही कंपनी गुंतवणूकदारांना बोनस शेअर देणार आहे. कंपनीने 3:1 प्रमाणात बोनस शेअर देण्याचे जाहीर केले आहे. कंपनी एका शेअरवर 3 शेअर मोफत देणार आहे.

2 / 6

बोनस शेअरची तारीख 10 एप्रिल 2026 पर्यंत आहे. अवेक्स अपरेल्स अँड अर्नामेंट्सचा शेअर 1 एप्रिल रोजी बीएसईवर 168 रुपयांवर बंद झाला होता. या कंपनीचा शेअर 52 आठवड्यांच्या उच्चांकावर आहे. तर गेल्या सात महिन्यात या शेअरने गुंतवणूकदारांना 235 टक्क्यांचा परतावा दिला आहे .

3 / 6

या सात महिन्यात कंपनीच्या शेअरमध्ये मोठी उसळी आली. हा शेअर 8 सप्टेंबर 2025 रोजी 50.13 रुपयांवर होता. कंपनीचा शेअर या 1 एप्रिल रोजी 168 रुपयांवर बंद झाला. गेल्या 6 महिन्यात अवेक्स अपेरल्स अँड अर्नामेंट्सच्या शेअरमध्ये 165 टक्क्यांहून अधिकची तेजी दिसली.

4 / 6

या कालावधीत कंपनीचा शेअर 63.20 रुपयांनी वाढून 168 रुपयांवर पोहचला. या कालावधीत या कंपनीच्या शेअरमध्ये 58 टक्क्यांची तेजी आली. तर गेल्या 3 महिन्यात या छोट्या कंपनीचा शेअर 74 टक्क्यांनी चढला. गेल्या एका वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये 196 टक्क्यांची उसळी दिसली.

5 / 6

यापूर्वी सुद्धा अवेक्स अपेरल्स अँड अर्नामेंट्सने बोनस शेअर दिला आहे. कंपनीने शेअर दोन हिश्यात वाटला. 27 मार्च 2026 रोजी स्टॉक स्प्लिट रेकॉर्ड डेट होती. ती पुढे आली आहे. कंपनी एका शेअरवर तीन शेअर फ्री देणार आहे.

6 / 6

डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us