
स्मॉलकॅप कंपनी शक्ती पम्पसच्या शेअरने रॉकेट भरारी घेतली. शक्ती पम्पसचा शेअर मंगळवारी BSE वर इंट्राडे दरम्यान 6 टक्क्यांच्या उसळीसह 796.90 रुपयांवर पोहचला. कंपनीचा शेअर गेल्या 4 दिवसांमध्ये 45 टक्क्यांची तेजी दिसून आली. या कंपनीला अनेक ऑर्डर मिळाले आहेत. त्यामुळे गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत.

यापूर्वी 1 डिसेंबर ते 10 डिसेंबर 2025 या दरम्यान 8 व्यापारी सत्रात शक्ती पम्पसच्या शेअरमध्ये सातत्याने घसरण दिसून आली. शक्ती पम्पसचा शेअर गेल्या आठवड्यात 52 आठवड्यातील 549 रुपयांचा निच्चांकी घसरण दिसली. पण त्यानंतर या आठवड्याच्या सुरुवातीला कंपनीने मोठी झेप घेतली.

शक्ती पम्पस कंपनीला सातत्याने ऑर्डर मिळत आहेत. शक्ती पम्पसला 11 डिसेंबर 2025 रोजी 443.78 कोटी रुपयांची ऑर्डर मिलाली. सोलर फोटोवॉल्टिक वॉटर पम्पच्या पुरवठ्याची ही ऑर्डर आहे. या कंपनीला महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्यूशन कंपनीकडून लेटर ऑफ इम्पॅनलमेंट मिळाले आहे.

शक्ती पम्पसचा शेअर गेल्या पाच वर्षात 1485 टक्क्यांहून अधिकने वधारला आह. स्मॉलकॅप कंपनीचा शेअर 18 डिसेंबर 2020 रोजी 48.85 रुपयांवर होता. शक्ती पम्पस शेअर 16 डिसेंबर 2025 रोजी इंट्राडे व्यापारी सत्रात 796.90 रुपयांवर व्यापार करत होता. गेल्या तीन वर्षांत या शेअर्समध्ये 1020 टक्क्यांहून अधिकने वधारला.

शक्ती पम्पस कंपनीने गुंतवणूकदारांना बोनस शेअरची भेट दिली आहे. कंपनीने नोव्हेंबर 2024 रोजी गुंतवणूकदारांना 5:1 या प्रमाणात बोनस शेअर दिला होता. कंपनीने प्रत्येक शेअरवर पाच बोनस शेअर दिले. या मल्बिबॅगर कंपनीने यापूर्वी सुद्धा बोनस शेअरचे गिफ्ट दिले होते.

डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.