CNG Issue : कुठे पूर्ण बंद, कुठे कमी दाब; मुंबईत सार्वजनिक वाहतूक कोलमडली, तुमच्या पंपावर काय स्थिती?

मुंबईत सीएनजीच्या तुटवड्यामुळे रिक्षा-टॅक्सी सेवा मोठ्या प्रमाणात ठप्प झाली आहे, ज्यामुळे सार्वजनिक वाहतूक विस्कळीत झाली आहे. GAIL च्या गॅसवाहिनीतील तांत्रिक बिघाडामुळे MGL पुरवठा खंडित झाला आहे.

| Updated on: Nov 18, 2025 | 11:25 AM
1 / 10
मुंबईत सध्या CNG चा तुटवडा जाणवत आहे. यामुळे मुंबईतील ४० ते ४५ टक्के रिक्षा-टॅक्सी सेवा ठप्प झाली आहे. यामुळे प्रवासी वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशीही पुरवठा पूर्ववत न झाल्याने अनेक पेट्रोल पंपावर दोन किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या आहेत.

2 / 10
मुंबईतील बहुतांश पंपांवर CNG बंद असे बोर्ड लावण्यात आले आहेत. यामुळे रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.

3 / 10
ठाण्यातील ऑनलाईन सीएनजी पंपांवर पहाटेपासूनच अर्धा ते एक किलोमीटरपर्यंत रिक्षांच्या रांगा दिसून येत आहेत. यामुळे चालकांना सीएनजी भरण्यासाठी तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे.

4 / 10
रिक्षा-टॅक्सी सेवा कोलमडल्यामुळे प्रवाशांचा संपूर्ण भार बेस्ट बसवर आला आहे. मुंबई शहरातील बेस्ट बससाठी अनेक डेपोबाहेर रांगा लागल्या आहेत. त्यामुळे नोकरदार वर्ग आणि विद्यार्थ्यांची प्रचंड गर्दी दिसून येत आहे.

5 / 10
सीएनजीच्या तुटवड्यामुळे नवी मुंबईसह संपूर्ण मुंबईत सार्वजनिक वाहतूक विस्कळीत झाली आहे. रिक्षा-टॅक्सी उपलब्ध नसल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

6 / 10
MGL कडून सीएनजी वापरकर्त्यांसाठी पर्यायी व्यवस्था म्हणून टेम्पो सीएनजी सप्लायद्वारे काही पंपांवर इंधन पुरवठा सुरू करण्यात आला आहे. मात्र, मागणीनुसार पुरवठा नसल्याने रांगा कमी होत नाहीत.

7 / 10
चेंबूरमधील एका पंपावर ३-४ तासांपासून रांगेत उभे राहूनही सीएनजी मिळत नसल्याने रिक्षा-टॅक्सी चालकांची दिवसाची कमाई पूर्णपणे थांबली आहे. त्यामुळे त्यांच्यात प्रचंड असंतोष आहे.

8 / 10
सीएनजीच्या तुटवड्यामुळे अनेक शाळांच्या बसवरही परिणाम झाला आहे. यामुळे विद्यार्थी आणि पालकांची अचानक मोठी गैरसोय झाली आहे. वाहतूक विस्कळीत झाल्याचा गैरफायदा घेत काही ठिकाणी प्रवाशांकडून रिक्षा-टॅक्सीसाठी अतिरिक्त भाडे आकारले जात आहे.

9 / 10
मुंबईतील जवळपास १३३ सीएनजी पंपांवर पुरवठा कमी दाबाने होत आहे. काही सीएनजी पंपावर पूर्णपणे पुरवठा बंद आहे. मोजक्या पंपांवर सीएनजी भरण्यासाठी खाजगी वाहने आणि टॅक्सींच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. सीएनजीच्या तुटवड्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत.

10 / 10
ट्रॉम्बे येथील RCF परिसरात 'गेल' (GAIL) च्या मुख्य गॅसपुरवठा वाहिनीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे रविवारी दुपारपासून MGL चा पुरवठा खंडित झाला आहे. मंगळवार सकाळी किंवा दुपारपर्यंत पुरवठा पूर्ववत होण्याची आशा आहे.