Costal Road Car Accident : गुजरातची BMW कोस्टल रोडवरुन थेट 50 फूट खाली कशी कोसळली, कारचा स्पीड त्यावेळी..थरारक अपघाताचे सर्व डिटेल्स
Costal Road Car Accident : मुंबईच्या आकर्षणापैकी एक असलेल्या कोस्टल रोडवर आज पहाटेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. कोस्टल रोडवर आज पहाटेच्या सुमारास एका बीएमडब्ल्यू गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

पहाटे 5.20 च्या सुमारास हा अपघात झाला. मुंबईतील कोस्टल रोडवर लाला कॉलेजसमोर लोटस जेटीजवळ भरधाव BMW कारचा अपघात झाला. गाडी क्रमांक DD01-C-6302 मरीन ड्राईव्हकडून हाजी अलीकडे उतरणाऱ्या कोस्टल रोडवर हा अपघात झाला. बीएमडब्ल्यू कार पुलावरुन थेट खाली कोसळली.
गाडी कोस्टल रोडच्या बाजूला असलेल्या दुभाजक आणि विद्युत वाहिनीच्या पोलला धडकली. धैर्य दर्शन शेठ वय (17), आदित्य जकासनिया (19) शनय गजर (21) अशी मृतांची नावं आहेत. आदित्य कल्पेश्वर ओसवाल (23) वर्ष वेटिंलटेरवर आहे.
ही गाडी गुजरातची आहे. दादरा नगर हवेली कार असून फाल्गुन गजर यांची ही गाडी आहे. पुढील तपास ताडदेव पोलीस करत आहेत. ताडदेव पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक मीना जगताप यांनी या अपघाताबद्दल माहिती दिली.
"या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला. एक जण जखमी आहे. ही मुलं मूळची अहमदाबाद येथील रहिवासी आहेत. शिक्षणासाठी ते जुहू आणि कुर्ला येथे राहत होते. ही गाडी DD दिव दमणची आहे. जखमी कल्पेश्वर ओसवालला उपचारासाठी नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
हा अपघात कसा घडला, याच्या कारणांचा पोलीस शोध घेत आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार अपघाताच्यावेळी बीएमडब्ल्यू गाडीचा वेग 200 पेक्षा जास्त होता. त्यामुळे ड्रायव्हरचं स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याची पोलिसांची माहिती आहे. गजर ज्याच्या मृत्यू झाला, त्याच्या नातेवाईकांची ही गाडी आहे.