मुंबईची तुंबई! ठिकठिकाणी साचलं पाणी, रस्ते-रेल्वे वाहतुकीवर परिणाम, जाणून घ्या सर्व अपडेट्स

मुंबईतील पावसाची स्थिती काय आहे, कुठे-कुठे पाणी साचलंय आणि रस्ते-रेल्वे वाहतुकीवर कसा परिणाम झाला आहे, याबद्दलचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर जाणून घ्या.. मध्य आणि हार्बर रेल्वे वाहतूक उशिराने सुरू आहे तर स्टेशनवर प्रवाशांची मोठी गर्दी पहायला मिळतेय.

| Updated on: Aug 18, 2025 | 11:18 AM
1 / 9
सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील दादरसह इतर भागात पाणी साचलं आहे. दादरच टी टी पूलजवळच्या पारसी कॉलनी परिसरात पाणी साचलं आहे. वडाळा, कुर्ल्यातही काही ठिकाणी गुडघाभर पाणी साचलं आहे.

2 / 9
पावसामुळे वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक संथ गतीने सुरू आहे. मुंबई आणि रायगडमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने इशारा दिला आहे.

3 / 9
पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. तर अंधेरी सब वे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

4 / 9
दादर स्टेशन परिसरात पाणी साचलं आहे. मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मोटर लावून पाणी काढण्याचं काम सुरू आहे. तसंच मुंबई पोलिसांकडून वाहतूक कोंडी सुरळीत करण्याचं काम सुरू आहे.

5 / 9
आज पहाटेपासूनच मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात पाऊस बरसतोय. त्यामुळे रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला आहे. मध्य आणि हार्बर लोकल 10 ते 15 मिनिटं उशिराने धावत आहेत.

6 / 9
मुंबईत संततधार पावसामुळे चुनाभट्टी विभागातील चुनाभट्टी रेल्वे स्टेशन, आंबेकर नगर, समर्थ नगर, भक्ती धाम रोड, धावजी केणी मार्ग, भाजी मार्केट, वि. एन.पूर्व मार्ग परिसरात पाणी साचलं आहे.

7 / 9
कुर्ला स्टेशनजवळ रेल्वे रुळांवर पाणी साचलं आहे. याचा परिणाम मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर झाला आहे. तर रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे.

8 / 9
सतत पडणाऱ्या पावसामुळे गायमुख ते मीरा रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली आहे. गायमुख घाटात अनेक जड वाहने अडकून पडली आहेत.

9 / 9
वसई-विरार, नालासोपारा परिसरात रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे. रात्रीपासून पडणाऱ्या पावसामुळे विरार पश्चिम यूनिटेक सोसायटीतील 35 ते चाळीस सोसायट्या पाण्याखाली गेल्या आहेत.