
'लागीर झालं जी' ही झी मराठीवरील प्रसिद्ध मालिका तुम्हाला आठवते का? या मालिकेत पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं. शितली आणि अज्या या लीडसोबतच मालिकेतील इतर पात्रही प्रेक्षकांना भावली. या मालिकेतील अभिनेत्री पूर्वा शिंदे...

'लागीर झालं जी' या मालिकेत जयडीची भूमिका करणारी अभिनेत्री तुम्हाला आठवते का? अभिनेत्री पूर्वा शिंदे हिने जयडीची भूमिका साकारली होती. गावातल्या सामन्य मुलीची भूमिका साकारणाऱ्या पूर्वाचा लूक आता पूर्णपणे बदलला आहे.

पूर्वा सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असते. पूर्वाने नुकतंच हे खास फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलेत. काहींना पूर्वाचा हा लूक आवडला आहे. तर काहींनी या फोटोंमुळे पूर्वाला प्रचंड ट्रोल केलं आहे.

ही आपली जयडीच आहे का?, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केलीय. तर ही तर मराठीतील मलायका अरोरा म्हणत दुसऱ्या नेटकऱ्याने कमेंट केलीय. यावर पूर्वाने thank youu! She is my favourite!, असं म्हणत उत्तर दिलं आहे.

लागीर झालं जी या मालिकेतील जयडी हे पूर्वाने साकारलेलं पात्र प्रेक्षकांना भावलं. आता सध्या पूर्वा झी मराठीवरच्या पारु या मालिकेत काम करतेय. 'जीव माझा गुंतला' या मालिकेतही तिने काम केलं आहे.