Railway TC : रेल्वे टीसी झाले हायटेक! स्मार्ट जॅकेटमध्ये बॉडी कॅमेरा अन् मायक्रोफोन; तिकिट न काढणाऱ्यांची खैर नाही

मुंबई लोकलमधील तिकीट तपासणी आता आणखी हायटेक होणार आहे. तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांसाठी खास जॅकेट आणि एका छोट्याशा उपकरणामुळे प्रवाशांशी होणाऱ्या संवादावर नजर ठेवली जाणार आहे. नेमकं काय आहे हे नवं तंत्रज्ञान आणि त्याचा प्रवाशांवर काय परिणाम होणार? जाणून घ्या सविस्तर...

| Updated on: Oct 09, 2026 | 11:59 AM
1 / 5
मुंबई सेंट्रल विभागात तिकीट तपासणी अधिक पारदर्शक करण्यासाठी बॉडी-वॉर्न कॅमेऱ्यांचा प्रायोगिक वापर सुरू होणार आहे. तपासणीदरम्यानच्या महत्त्वाच्या प्रसंगांची नोंद या माध्यमातून ठेवली जाणार आहे.

मुंबई सेंट्रल विभागात तिकीट तपासणी अधिक पारदर्शक करण्यासाठी बॉडी-वॉर्न कॅमेऱ्यांचा प्रायोगिक वापर सुरू होणार आहे. तपासणीदरम्यानच्या महत्त्वाच्या प्रसंगांची नोंद या माध्यमातून ठेवली जाणार आहे.

2 / 5

नव्या जॅकेटमध्ये तिकीट तपासणीसाठी आवश्यक उपकरणे व्यवस्थित ठेवता येणार आहेत. कॅमेरा, मायक्रोफोन, एचएचटी मशीन आणि ओळखपत्रासाठी स्वतंत्र व्यवस्था असल्याने कर्मचाऱ्यांचे काम अधिक सोपे होणार आहे.

3 / 5

प्रवासी आणि तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाल्यास त्या वेळच्या घटनांचे रेकॉर्डिंग महत्त्वाचे ठरणार आहे. तक्रारींची चौकशी करताना या फुटेजचा आधार घेता येणार आहे.

4 / 5

प्रायोगिक टप्प्यात एसी लोकलमधील तिकीट तपासणीवर विशेष लक्ष दिले जाणार आहे. प्रवाशांशी संवाद साधताना शिस्त, सौजन्य आणि पारदर्शकता राखण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जाणार आहे.

5 / 5

पहिल्या टप्प्यात 15 बॉडी कॅमेरे आणि 30 विशेष जॅकेट वापरण्याची तयारी करण्यात आली आहे. प्रयोगाच्या निष्कर्षांनुसार भविष्यात या तंत्रज्ञानाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us