Mumbai Metro : मेट्रोत प्रवास करताना बॅगेत ठेवू नका या गोष्टी; बसेल मोठा फटका

मुंबई मेट्रो लाइन ३ च्या उद्घाटनाने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासासाठी ही मेट्रो उत्तम पर्याय आहे. मात्र, तुमच्या व इतरांच्या सुरक्षिततेसाठी काही वस्तू मेट्रोमध्ये नेण्यास सक्त मनाई आहे.

| Updated on: Oct 10, 2025 | 10:49 AM
1 / 10
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच मुंबई मेट्रो लाइन 3 च्या अंतिम टप्प्याचे उद्घाटन केले. यानंतर गुरुवारी ९ ऑक्टोबरपासून दक्षिण मुंबईतील कफ परेड ते पश्चिम उपनगरातील आरे जेवीएलआरपर्यंत मेट्रो धावायला सुरुवात झाली.

2 / 10
मुंबईतील मेट्रो लाइन ३ सुरु झाल्याने मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला. ही मेट्रो सुरु झाल्या झाल्या प्रवाशांकडून याला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. मेट्रोने प्रवास करणे हे भारतातील शहरी वाहतुकीच्या सर्वात सुरक्षित आणि सोयीस्कर माध्यमांपैकी एक मानले जाते.

3 / 10
सीसीटीव्ही कॅमेरे आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (CISF) सुरक्षा कर्मचारी यांच्या २४ तास निरीक्षणामुळे प्रवासी सुरक्षितपणे प्रवास करू शकतात. मात्र प्रवाशांच्या आणि सार्वजनिक मालमत्तेच्या सुरक्षिततेसाठी मेट्रो स्थानके आणि गाड्यांमध्ये काही विशिष्ट वस्तू सोबत घेऊन जाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

4 / 10
जर तुमच्याकडे सुरक्षा तपासणीदरम्यान या वस्तू आढळल्या, तर त्या जप्त केल्या जाऊ शकतात. आता या वस्तू नेमक्या कोणत्या याबद्दलची यादी समोर आली आहे.

5 / 10
मेट्रोमध्ये चाकू, कात्री, तलवारी, ब्लेड आणि पिस्तूल यांसारखी कोणतीही शस्त्रे किंवा शस्त्र म्हणून वापरली जाणारी साधने सोबत नेण्यास मनाई आहे. कारण या सर्व वस्तू प्रवाशांच्या सुरक्षिततेला गंभीर धोका निर्माण करू शकतात.

6 / 10
खेळण्यांच्या बंदुका, तलवारी किंवा इतर शस्त्रांची प्रतिकृती (Replica) यांना देखील मेट्रोमध्ये परवानगी नाही. यामुळे इतर प्रवाशांमध्ये भीती निर्माण होऊ शकते.

7 / 10
स्फोटक आणि ज्वलनशील पदार्थ जसे की ग्रेनेड, गनपावडर, फटाके आणि प्लास्टिक स्फोटके यांसारखी कोणतीही स्फोटक सामग्री मेट्रोमध्ये सक्त मनाई आहे.

8 / 10
मेट्रो स्थानके आणि गाड्यांमध्ये आग लागण्याचा धोका टाळण्यासाठी, एलपीजी सिलेंडर, पेट्रोलियम, रंग, ओल्या बॅटरी आणि इतर कोणताही ज्वलनशील किंवा ज्वालाग्राही पदार्थांवर पूर्णपणे बंदी आहे.

9 / 10
त्यासोबतच स्क्रूड्रायव्हर्स, प्लायर्स, टेस्टर आणि इतर साधने सोबत नेण्यास देखील बंदी आहे. सुरक्षेच्या दृष्टीने यांचा वापर शस्त्र म्हणून होण्याची शक्यता असल्याने हा नियम लागू करण्यात आला आहे.

10 / 10
तसेच तेल, तूप किंवा इतर द्रवपदार्थ उघडपणे वाहून नेण्यास मनाई करण्यात आली आहे. असे पदार्थ सोबत घेऊन गेल्यास ते सांडण्याची भीती असते. त्यामुळे मेट्रो प्रवाशांनी सहकार्य करावे आणि सुरक्षा नियमांचे पालन करावे, अशी सूचना देण्यात आली आहे.