Mumbai Rain : मुंबईकरांसाठी मोठी खुशखबर, पाण्याची चिंता मिटली, धरणं किती भरले?

दरम्यान, सध्या मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मुंबईला पाणी पुरवणाऱ्या धरणांमध्ये पाण्याची आवक वाढली असून या धरणांची पाणीपातळी वाढली आहे. गेल्या 24 तासांत मुंबईला पाणी पुरवणाऱ्या जलाशयांत 6.06 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

| Updated on: Jul 25, 2026 | 9:00 PM
1 / 5
मुंबई हे असं शहर आहे, जिथं रोज शेकडो लोक वास्तव्यास येतात. दिवसेंदिवस हे शहर विस्तारत आहे. वाढती लोकसंख्या लक्षात घेता मुंबईतील पायाभूत सुविधांवर मोठा ताण पडत आहे. याच वाढत्या लोकसंख्येमुळे आजकाल मुंबईला पाणीटंचाईचा सामना करावा लागतोय.

2 / 5

आजकाल प्रत्येक उन्हाळ्यात मुंबईला पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. त्यामुळे उन्हाळ्याच्या शेवटी मुंबईकरांना पाणीकपातीला समोरे जावे लागते. मुंबईला पाणी पुरवणारी धरणं चांगली भरली तरच या पाणीकपातीपासून सुटका मिळते.

3 / 5

दरम्यान, सध्या मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मुंबईला पाणी पुरवणाऱ्या धरणांमध्ये पाण्याची आवक वाढली असून या धरणांची पाणीपातळी वाढली आहे. गेल्या 24 तासांत मुंबईला पाणी पुरवणाऱ्या जलाशयांत 6.06 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

4 / 5

मिळालेल्या माहितीनुसार दिनांक २४ जुलै २०२६ रोजी सकाळी ६ ते शनिवार आणि दिनांक २५ जुलै २०२६ सकाळी ६ या २४ तासात चांगला पाऊस झाला. यामुळेच जलसाठ्यात वाढ झाली आहे.

5 / 5

चांगला पाऊस झाल्याने मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या एकूण ७ जलाशयांचा साठा ८३.६८ % टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. आता पावसाळा अजूनही संपलेला नाही. त्यामुळे भविष्यातील पावसामुळेही ही जलाशये भरणार आहेत. त्यामुळे मुंबईची पाणीटंचाईची चिंता कमी होणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us