रणवीरला ‘धुरंधर’ बनवणारा जिम ट्रेनरच एजंटच्या भूमिकेत? महिलेनं बदललं आयुष्य; एकेकाळी कमवायचा फक्त 10 हजार

मुस्तफाने रणवीर सिंहला त्याच्या 'पद्मावत' या चित्रपटातील भूमिकेसाठी ट्रेन केलं होतं. याशिवाय त्याने यामी गौतम आणि विकी कौशल यांनासुद्धा फिटनेस ट्रेनिंग दिली आहे. मुस्तफाचं आयुष्य कसं बदललं आणि तो जिम ट्रेनर कसा बनला, याविषयी जाणून घ्या..

| Updated on: Mar 23, 2026 | 1:33 PM
1 / 6
आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर : द रिव्हेंज' या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी सुरू आहे. रणवीर सिंहसोबतच यातील प्रत्येक भूमिकेनं प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे. सहाय्यक भूमिका साकारणाऱ्या कलाकारांनीही यात उत्तम काम केलं आहे. त्यापैकीच एक मुस्तफा अहमद आहे.

आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर : द रिव्हेंज' या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी सुरू आहे. रणवीर सिंहसोबतच यातील प्रत्येक भूमिकेनं प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे. सहाय्यक भूमिका साकारणाऱ्या कलाकारांनीही यात उत्तम काम केलं आहे. त्यापैकीच एक मुस्तफा अहमद आहे.

2 / 6

'धुरंधर : द रिव्हेंज'मध्ये एजंट बनलेल्या रिजवान शाहची भूमिका मुस्तफा अहमदने साकारली आहे. त्याच्या भूमिकेचं सध्या सोशल मीडियावर विशेष कौतुक होत आहे. परंतु तुम्हाला माहीत आहे का, की मुस्तफा खऱ्या आयुष्यात एक जिम ट्रेनर आहे.

3 / 6

मुस्तफा अहमदने बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींना फिटनेस ट्रेनिंग दिली आहे. त्यापूर्वी तो दिल्लीतल्या जनकपुरी इथल्या जिममध्ये फिटनेस ट्रेनर म्हणून नोकरी करत होता. त्यासाठी त्याला दर महिन्याला दहा हजार रुपये पगार मिळत होता.

4 / 6

15 वर्षांच्या संघर्षानंतर मुस्तफाला अभिनेता हृतिक रोशनचा पर्सनल ट्रेनर बनण्याची संधी मिळाली. त्याचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. या प्रवासाबद्दल त्याने एका पॉडकास्ट मुलाखतीत खुलासा केला होता.

5 / 6

'जग ऑफ ऑल ट्रेंड्स' या पॉडकास्ट मुलाखतीत मुस्तफा म्हणाला, "मी लहानपणी एवढा हुशार नव्हतो. मला डिस्लेक्सिया होता. परंतु शारीरिकदृष्ट्या मी खूप बलवान होतो. खेळ, डान्स यांमध्ये मी चांगला होतो. वयाच्या 21 व्या वर्षी मी एका कॉल सेंटरमध्ये टीम लीडर म्हणून काम करू लागलो होतो."

6 / 6

"एके दिवशी मला जनकपुरीच्या जिममध्ये एक महिला भेटली, तिच्याकडे तिचा जिम ट्रेनर दुर्लक्ष करत होता. त्या महिलेची मी मदत केली आणि तेव्हापासूनच मी जिम ट्रेनर म्हणून कामाला सुरुवात केली", असं त्याने पुढे सांगितलं. नंतर हळूहळू त्याला सेशनचे पैसे मिळू लागले होते. एका तासाच्या सेशनचे त्याला 600 रुपये मिळू लागले होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us