
नागपुरात दुहेरी हत्याकांड घडला आहे. सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे.

बुधवारी रात्रीच्या सुमारास वसंतराव नाईक झोपडपट्टी येथे दोन जणांचा खून झाला आहे.

ज्या ठिकाणी दोघांवर हल्ला झाला होता, त्या परिसराचे नाव वसंतराव नाईक झोपडपट्टी असे आहे.

या हल्ल्यात सागर मसराम याचा घटनास्थळी तर लक्ष्मण गोडे याचा शासकीय रुग्णालयात उपचार दरम्यान मृत्यू झाला.

यातील सागर मसराम हा सराईत गुन्हेगार असल्याची माहिती मिळते आहे. जुन्या वादातून दोघांवर हल्ला करून खून करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.

या खून प्रकरणात चंदू नावाच्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.