
देशभरात 75 व्या स्वातंत्र्य दिनाचा मोठा उत्साह आहे. नागपुरातंही आज ठिकठिकाणी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय.

कोरोनाच्या संकटात रक्तदानाबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशानं देवता फाऊंडेशनकडून आज स्वातंत्र्य दिनी नागपूरात ‘वंदे मातरम सायकल रॅली’ काढण्यात आली.

या रॅलीत अनेक तरुणांनी सहभाग घेतला आणि रक्तदान करण्याचं आवाहन केलं.

कॅंसर पिडीत आणि इतर रुग्णांना रक्त मिळावं म्हणून ‘वंदे मात्र सायकल रॅली’ काढण्यात आली होती.