पहिलाच चित्रपट अन् रातोरात झाला स्टार, अचानक झाला इंडस्ट्रीमधून गायब, उडालेली मृत्यूची अफवा

पहिल्याच चित्रपटातून या अभिनेत्याला मिळालेली प्रचंड प्रसिद्धी, एका रात्रीत झाला स्टार. नंतर अचानक इंडस्ट्रीमधून झाला गायब. सोशल मीडियावर उडालेली मृत्यूची अफवा. कोण आहे हा अभिनेता?

| Updated on: Jun 22, 2026 | 5:48 PM
1 / 5
बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार एका चित्रपटामुळे रातोरात स्टार बनतात, मात्र त्यानंतर त्यांचे करिअर अपेक्षेप्रमाणे पुढे जात नाही. अशाच कलाकारांपैकी एक म्हणजे अभिनेता नकुल कपूर. 2000 च्या दशकाच्या सुरुवातीला आपल्या लूक आणि रोमँटिक प्रतिमेमुळे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा नकुल कपूर आज चित्रपटसृष्टीपासून पूर्णपणे दूर आहे.

2 / 5
नकुल कपूरने 1998 मध्ये 'हो गई है मोहब्बत तुमसे' या लोकप्रिय म्युझिक व्हिडिओमधून मनोरंजन क्षेत्रात प्रवेश केला. या गाण्यामुळे त्याला मोठी लोकप्रियता मिळाली.

3 / 5
त्यानंतर 2002 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'तुमसे अच्छा कौन है' या चित्रपटातून त्याला मोठा ब्रेक मिळाला. किम शर्मा आणि आरती छाबडिया यांच्यासोबतच्या या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे आणि रोमँटिक अंदाजाचे प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केले.

4 / 5
त्या काळात शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान आणि अक्षय कुमार यांसारख्या स्टार्सचे वर्चस्व असतानाही नकुल कपूरकडे बॉलिवूडचा भावी सुपरस्टार म्हणून पाहिले जात होते. मात्र, पहिल्या यशानंतर तो अचानक चित्रपटसृष्टीतून गायब झाला आणि त्याबाबत अनेक अफवा पसरू लागल्या.

5 / 5
नकुलच्या निधनाच्या अफवाही एकेकाळी सोशल मीडियावर जोरात पसरल्या होत्या. काहींनी अपघातात त्याचा मृत्यू झाल्याचा दावा केला तर काहींनी गंभीर आजारामुळे त्याचे निधन झाल्याचे म्हटले. मात्र, नंतर स्वतः नकुलने या सर्व अफवा फेटाळून लावत आपण सुखरूप आणि निरोगी असल्याचे स्पष्ट केले.

Follow Us