Nashik firing case : आरपीआय नेत्याच्या ऑफीसमध्ये गुप्त भुयार, आत जे मिळालं ते पाहून पोलीसही हादरले, exclusive photos

सातपूर गोळीबार प्रकरणात सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे, या प्रकरणातील आरोपीच्या कार्यालयात पोलिसांना एक गुप्त भुयार आढळून आलं आहे, या भुयारात धक्कादायक वस्तू सापडल्या आहेत.

| Updated on: Oct 13, 2025 | 2:58 PM
1 / 7
 सातपूर गोळीबार प्रकरणात सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे, लोंढे टोळीचा मोरख्या आणि आरपीआयचा नेता तसेच माजी नगरसेवक असलेल्या प्रकाश लोंढे याच्या कार्यालयाची झाडाझडती पोलिसांकडून घेण्यात आली आहे, त्याच्या कार्यालयात गुप्त भुयार आढळून आलं आहे.

2 / 7
सातपूर गोळीबार प्रकरणानं जिल्हासह राज्यात खळबळ उडाली आहे, या प्रकरणात  माजी नगरसवेक असलेल्या प्रकाश लोंढे, दीपक लोंढे याच्यासह सात जणांना अटक करण्यात आली आहे.

3 / 7
अटक करण्यात आलेल्या आरोपींची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे, याचदरम्यान पोलिसांकडून प्रकाश लोढे यांच्या कार्यालयाची झडती देखील घेण्यात आली आहे.

4 / 7
प्रकाश लोंढे याच्या कार्यालयाची झडती सुरू असतानाच पोलिसांना त्याच्या कार्यालयात एक गुप्त भुयार आढळून आलं आहे, हे भुयार पाहून पोलिसांनाही धक्का बसला आहे.

5 / 7
पोलिसांनी या भुयाराची तपासणी केली असता, त्यामध्ये त्यांना  शस्रं आढळून आली आहेत, या भुयारातून पोलिसांनी दोन कुऱ्हाडी आणि  एक चाकू जप्त केला आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

6 / 7
दरम्यान या प्रकरणात फरार असलेल्या भूषण लोंढेचा पोलिसांकडून शोध सुरू आहे, त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून चार पथक तयार करण्यात आली आहेत. या प्रकरणात आणखी काही धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्यता आहे.

7 / 7
तर दुसरीकडे अपहरण झालेल्या डॉक्टरासह त्याच्या कुटुंबाचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे, प्रकाश लोंढेच्या अनधिकृत मालमत्तांवर नाशिक महापालिका हातोडा चालवणारा असल्याची माहिती देखील समोर आली आहे.