
मुसळधार पावसामुळे कसारा घाटात बुधवारी रात्री दरड कोसळली. त्यामुळे कसाऱ्यातून नाशिककडे जाणारा मार्ग बंद झाला आहे

कसारा घाटामध्ये इगतपुरीजवळ रेल्वे ट्रॅकवर दरड कोसळल्यामुळे नाशिक-मुंबई दरम्यान रेल्वे वाहतूक रद्द करण्यात आलेली आहे.

या मार्गावर धावणाऱ्या काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, काही ट्रेन अर्ध्यावर थांबवण्यात आल्या आहेत, तर काही ट्रेनचे मार्ग वळवण्यात आले आहेत.

टिटवाळा-इगतपुरी तसेच अंबरनाथ-लोणावळा या मार्गावरील रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली.

ट्रॅकवर साचलेल्या मातीच्या ढिगाऱ्याला हटवण्याचे काम सुरु आहे. अनेक कामगार मध्यरात्रीपासून रेल्वे ट्रॅक पूर्ववत करण्याच्या प्रयत्नात आहेत.

गुरुवार दुपारपर्यंत नाशिक-मुंबई दरम्यान रेल्वे वाहतूक सुरळीत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.