PHOTO: आई खरंच काय असते, लेकराची माय असते, वासराची गाय असते, दुधाची साय असते…!

आई खरंच काय असते? या प्रश्नाचे उत्तर अजून तरी कोणालाही सापडले नसेल. मग ते मातृत्व मनुष्यातले असो की, प्राणी मात्रातले. नाशिकमध्ये एका शेतात असेच आगळेवेगळे ममत्व पाहायला मिळाले. अंजनेरी परिमंडळातल्या तळवाडे शिवारातील उसाच्या शेतात अनेक दिवसांपासून एक बिबट्याची मादी आणि तिच्या पिल्ल्यांचे वास्तव्य होते. गावकऱ्यांना याची काहीही कल्पना नव्हती. मात्र, जेव्हा ऊस काढणीला आला, तेव्हा कामगारांना उसाच्या सरीत बिबट्याची तीन छोटी पिल्ले सापडली. त्यांनी ही माहिती वनविभागाला दिली. वनविभागाने या शेतात कॅमेरा लावला. या कॅमेऱ्याने अनोखे मातृत्व टिपले. काय ते तुम्हीही पाहाच!

| Edited By: | Updated on: Mar 02, 2022 | 4:25 PM
1 / 6
नाशिकमधील तळवाडे शिवारातील उसाच्या फडात कामगारांनी बिबट्याची पिल्ले असल्याचे पाहिले.

नाशिकमधील तळवाडे शिवारातील उसाच्या फडात कामगारांनी बिबट्याची पिल्ले असल्याचे पाहिले.

2 / 6
बिबट्याची माहिती वनविभागाला दिली. त्यांनी येथे कॅमेरा लावला. तेव्हा प्राण्यांमधले मातृत्व दिसले.

बिबट्याची माहिती वनविभागाला दिली. त्यांनी येथे कॅमेरा लावला. तेव्हा प्राण्यांमधले मातृत्व दिसले.

3 / 6
मादी बिबट्यालाही माणसांची चाहुल लागली. तिने उसतोडीचा अंदाज घेत येथून पिल्लाला हलवले.

मादी बिबट्यालाही माणसांची चाहुल लागली. तिने उसतोडीचा अंदाज घेत येथून पिल्लाला हलवले.

4 / 6
बिबट्याने आपल्या जबड्यात अतिशय नाजुकपणे ही पिल्ले धरली आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी नेले.

बिबट्याने आपल्या जबड्यात अतिशय नाजुकपणे ही पिल्ले धरली आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी नेले.

5 / 6
बिबट्याने आपल्या पिल्लाला कसे नेले, हे कॅमेऱ्याने टिपले. या मातृत्वाची सगळीकडे चर्चा सुरू आहे.

बिबट्याने आपल्या पिल्लाला कसे नेले, हे कॅमेऱ्याने टिपले. या मातृत्वाची सगळीकडे चर्चा सुरू आहे.

6 / 6
नाशिकमध्ये पुन्हा एकदा बिबट्याचा वावर समोर आल्याने शेतकऱ्यांमध्ये मात्र भीतीचे वातावरण आहे.

नाशिकमध्ये पुन्हा एकदा बिबट्याचा वावर समोर आल्याने शेतकऱ्यांमध्ये मात्र भीतीचे वातावरण आहे.