
नामपूरसह परिसरात सायंकाळी सहाच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा काढणीला आलेला गहू मातीमोल झाला. सटाणा तालुक्यातील करंजाड परिसरात कांद्याचे शेड कोसळल्याने नुकसान झाले आहे.

नाशिक जिल्ह्यातील उत्राणे, राजपूरपांडे, श्रीपूरवडे या भागात जोरदार पाऊस सुरू झाला. नामपूर येथील शेतकरी भाऊसाहेब कापडणीस यांच्या सहा एकर गव्हाचे नुकसान झाले.

जायखेडा परिसरात सायंकाळी सहाच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. रात्री उशिरापर्यंत थांबून थांबून पाऊस सुरू होता.

उत्तर महाराष्ट्रात अजून काही दिवस अवकाळी पावसाची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग धास्तावला आहे. शिल्लक राहिलेले पीक विविध रोगांच्या पादुर्भावापासून कसे वाचवायचे हा मोठा प्रश्न आहे.