
काही महिन्यांपूर्वी झालेल्या एका मुलाखतीदरम्यान निळी साडी नेसून आलेल्या गिरीजा ओकच्या त्या लूकवर लाखो लोक फिदा झाले आणि पाहता पाहता ती 'नॅशनल क्रश' बनली. गेल्या दोनेक महिन्यांपासून सोशल मीडियावर ती प्रचंड ट्रेडिंग असून तिचे फोटो, फोटशूट्स, तिचे लूक्स, तिच्या मुलाखती सतत चर्चेत आहेत. लोकांना तिच्याबद्दल विविध माहिती जाणून घेण्याची खूप इच्छा असते.

गिरीजा ही नुकतीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या ‘चना पोहा विथ नितीनजी’ या हटके कार्यक्रमात म्हणून सहभागी झाली. पण त्यात फक्त औपचारिक न बोलता तिन अगदी दिलखुलास गप्पा मारल्या. पुण्यात राहणारी, कामामुळे मुंबईत सेटल झालेली गिरीजा हिचं नागपूरशी देखील खास कनेक्शन असल्याचं समोर आलं.

नागपूरशी गिरीजाचा खास संबंध, कारण तिचं आजोळ नागपुरातील आहे. म्हणूनच अजूनही तिचं नागपूरशी खास नातं आहे. नागपूरची सांबरवडी म्हणजेच ज्याला आपण पुडाची वडी म्हणतो, ती तर गिरीजाला प्रचंड आवडते. या मुलाखतीत ती नागपूरबद्दल भरभरून बोलली.

नागपूरमध्ये तिचं आजोळ असून इथे तिचे मामा-मामी तसेच भावंडंही राहतात. एका मुलाखतीमुळे 'नॅशनल क्रश' झालेल्या गिरीजावर सगळे फिदा आहेत, तिचा जीव मात्र नागपूरच्या पदार्थांवर जडला. नागपूरमधली पुडाची म्हणजेच सांबरवडी, तर्री पोहे आणि गोळाभातावर आपलं मन अजूनही अडकलेलं असल्याचं तिने नुकतंच कबूल केलं.

'मी जगात कुठेही असले तरी नागपूरची सांबरवडी, तर्री पोहे पाहिले की माझ्या तोंडाला पाणी सुटतंच.' असं तिने नितीन गडकरी यांच्याशी गप्पा मारताना सांगितलं. अभिनेते डॉ. गिरीश ओक आणि पदमजा पाठक यांची लेक असलेल्या गिरिजाचा जन्म नागपूरमध्ये झाला. तिची आई पद्मश्री फाटक नागपूरच्या असल्यामुळे तिचं बालपण आजोळी, मामा-मामी आणि भावंडांसोबत मजेत गेलं.

शिक्षणामुळे ती महाराष्ट्रात विविध ठिकाणी राहिली तरी सुट्ट्यांसाठी हमखास नापूरला यायची. लहानपणीच्या अनेक गोड आठवणी इथल्याच आहेत, असं तिने सांगितलं. अभिनय आणि कामाच्या व्यापात आता नागपूरला येणं कमी झालं असलं तरी लहानपणी नागपूरनध्ये, अंगणात खेळलेले दिवस अजूनही मनाच्या कोपऱ्यात जपलेले आहेत, असंही ती म्हणाली.

‘चना पोहा विथ नितीनजी’ या कार्यक्रमात तिने नागपूरच्या बदलत्या स्वरूपावरही भाष्य केलं. शहराच्या बदलत्या स्वरूपामुळे काही गोष्टी वेगळ्या वाटत असल्या तरी, लहानपण आणि पारंपारिक जेवणाची आठवण नेहमी हृदयात असतं असं गिरीजाने नमूद केलं.