
आपण बसमधून प्रवास करताना गाणी ऐकतो किंवा फोनवर बोलत असतो. हीच सवय तुम्हालाही असेल तर आधीच सावध व्हा... ही बातमी वाचा...

बसमधून जाताना जर तुम्ही मोठ्या आवाजात बोलत असाल. मोठ्या आवाजात गाणी ऐकल्यास किंवा व्हीडिओ पाहिल्यास तुमच्यावर कारवाई होऊ शकते.

बसमध्ये अनेकजण मोठमोठ्याने बोलत असतात. त्यांच्या या आवाजामुळे सहप्रवाशांना त्रास होतो. त्यामुळे नवी मुंबई प्रशासनाकडून नवे नियम जारी करण्यात आले आहेत.

नवी मुंबईत तुम्ही बसमधून प्रवास करत असाल आणि मोठ्या आवाजात बोलत असाल तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते.

पण जर तुम्ही यातील कोणतीही कृती केली नाही. आपल्या सहप्रवाशाला त्रास होणार नाही, याची काळजी घेतली. तर तुमचा प्रवास सुखाचा होऊ शकतो. त्यामुळे नियम पाळा आणि कारवाई टाळा!