कमळाचे डिझाईन, 5G कनेक्टिव्हिटी अन् आरामासाठी…; नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आतून कसं दिसतं? पाहा Photos

पंतप्रधान नरेंद्र मोदी ८ आणि ९ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (NMIA) आणि मुंबई मेट्रो लाईन-३ चे उद्घाटन करतील. हे प्रकल्प मुंबई आणि महाराष्ट्राची कनेक्टिव्हिटी व पायाभूत सुविधा वाढवतील.

Updated on: Oct 07, 2025 | 3:45 PM
1 / 10
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या ८ आणि ९ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्राच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर येत आहे. या दौऱ्यात ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (NMIA) पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करणार आहेत.

2 / 10
यामुळे आता मुंबईसह उपनगर आणि नवी मुंबईकरांना छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळानंतर आणखी एक भव्य आंतरराष्ट्रीय विमानतळ मिळणार आहे.  'लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ' असे या विमानतळाचे नाव देण्यात आले आहे.

3 / 10
या विमानतळाच्या बांधणीसाठी जवळपास १९ हजार ६५० कोटी रुपये खर्च आला आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे डिझाईन भारताचे राष्ट्रीय फूल असलेल्या कमळाच्या डिझाईनने प्रेरित आहे. ज्यामुळे याला एक आकर्षक रुप आले आहे.

4 / 10
नवी मुंबई विमानतळावर अत्याधुनिक तंत्रज्ञान बसवण्यात आले आहे. प्रवाशांसाठीचा अनुभव जलद आणि संपर्क-मुक्त करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.

5 / 10
या विमानतळावर 5G कनेक्टिव्हिटी आणि 'डिजी यात्रा' (Digi Yatra) सुविधा उपलब्ध असणार आहे. या टर्मिनल १ मध्ये ६६ चेक-इन काउंटर, २२ सेल्फ-बॅगेज ड्रॉप युनिट्स आणि २९ एरोब्रिजेसची सुविधा असणार आहे.

6 / 10
प्रवाशांच्या सोयीसाठी ८० खोल्यांचे ट्रान्झिट/डे हॉटेल आणि प्राणाम (Pranaam) सेवा उपलब्ध असणार आहे. हे विमानतळ जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (JNPT) पासून केवळ १४ किमी दूर असल्यामुळे मालवाहतुकीसाठी (Cargo) ते एक मोठे केंद्र ठरू शकते.

7 / 10
नवी मुंबई विमानतळ कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने देशातील सर्वोत्तम ठरणार आहे. हे विमानतळ मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (अटल सेतू), रस्ते, रेल्वे आणि मेट्रो सोबतच वॉटर टॅक्सी सेवांनी जोडले जाणार आहे.

8 / 10
NMIA ची संकल्पना ग्रीन एअरपोर्ट तत्त्वांवर आधारित असून येत्या डिसेंबर २०२५ पासून या ठिकाणाहून विमानसेवा सुरु होणार आहे, असे बोललं जात आहे.

9 / 10
या विमानतळाच्या उद्घाटनासोबतच पंतप्रधान मोदी अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांचे उद्घाटन करणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई मेट्रो लाईन-३ च्या अंतिम टप्प्याचेही उद्घाटन करणार आहेत. मेट्रो-३ प्रकल्पासाठी ३७ हजार २७० कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च आला आहे.

10 / 10
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कॉमन मोबिलिटी ॲप मुंबई वन लाँच करण्यात येणार आहे. या ॲपद्वारे मेट्रो, मोनोरेल्वे, उपनगरीय रेल्वे आणि सार्वजनिक वाहतूक बसेसची तिकीटं काढता येणार आहेत. यात मुंबई मेट्रो १, २अ, ३, ७, नवी मुंबई मेट्रो, तसेच बेस्ट, ठाणे, मीरा भाईंदर, कल्याण-डोंबिवली, आणि नवी मुंबई पालिका परिवहनचा समावेश असेल.