Navratri 2026: नवरात्रीत ‘घट’ आणि ‘अखंड दिवा’ का लावतात? 9 दिवसांच्या या परंपरेमागचं धार्मिक महत्त्व जाणून घ्या
येत्या रविवारी ११ ऑक्टोबरला शारदीय नवरात्री उत्सवाला सुरुवात होत आहे, डान्स, गरबा, देवीची पूजा, या सगळ्या गोष्टी नऊ दिवसात केल्या जातात, नवरात्रीत 'घट' आणि 'अखंड दिवा' लावला जातो, नऊ दिवस अखंड दिवा तेवत ठेवण्याची परंपरा आहे, मात्र घट आणि अखंड दिवा का लावतात? असा कधी प्रश्न पडला आहे का? आज तेच आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी बातमी पुढे वाचा आणि जाणून घ्या संपूर्ण माहिती आणि महत्व.

घट म्हणजे लघु-ब्रह्मांड: घटाची रचना विश्वाच्या उत्पत्तीचे प्रतीक आहे. कलशाच्या मुखात भगवान विष्णू, कंठात रुद्र आणि मूळ भागात ब्रह्मदेवाचा वास असतो, तर मध्यभागी सर्व मातृका (देवी शक्ती) वास करतात असे मानले जाते.
सप्तधान्य आणि मातीचा सन्मान: घटाखाली स्वच्छ काळी माती किंवा वाळू पसरून त्यात सात प्रक्रारची धान्ये (गहू, सातू/जव, तीळ, मूग, उडीद, बाजरी, चणे) पेरली जातात. नऊ दिवसांत धान्याची उगवण किती हिरवागार होते, यावरून येणाच्या वर्षातील शेती आणि समूद्धीचा शुभ संकेत मानला जातो.
अखंड ज्योतीचे नियम व महत्व : देवीच्या डाव्या बाजूला तुपाचा दिवा किंवा उजव्या बाजूला तेलाचा (तिळाचे तेल) दिवा ठेवण्याची परंपरा आहे.
जशी ज्योत अखंड ऊर्ध्वगामी (वरच्या दिशेने) जळते, तसाच माणसाचा अध्यात्मातील प्रवासही सतत उच्च पातळीकडे होत राहावा, हा त्यामागील संदेश आहे