
'झी मराठी' वाहिनीवरील 'नवरी मिळे हिटलरला' या मालिकेचं कथानक अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. एजे आणि लीला यांचं नातं आणखी दृढ होतंय.

लीला घराच्या जबाबदारीला सामोरं जात असताना दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती सतत अडचणी निर्माण करत आहेत. याच दरम्यान, किशोर लीलाच्या प्रयत्नांना असफल करण्याचा प्रयत्न करतोय.

ज्यामुळे लीलाला प्रत्येक टप्प्यावर संघर्ष करायला लागतोय. एका धक्कादायक वळणावर, घरात कोणी नसताना एक चोर लीलावर हल्ला करतो.

मात्र, लीला या हल्ल्यापासून वाचते. या धाडसामुळे एजे लीलाच्या आणखी जवळ येतो. मात्र यामुळे दुर्गा अस्वस्थ होते.

आता लीलाला एजे सोबत एका जाहिरातीमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे. एजेसोबत काम करण्याचा विचाराने ती खूप उत्साहित होते. जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान एजे आणि लीला यांचं नातं आणखी दृढ होत जाणार आहे.