
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाला आहे. बारामतीत एका शेतात हे विमान कोसळलं आहे. अजित पवार यांची आज बारामतीमध्ये सभा होती.

अजित पवार हे मुंबईहून बारामतीला येत होते अशी प्राथमिक माहिती आहे. त्यावेळी लँडिंग दरम्यान या विमानाला अपघात झाला. अजित पवार यांच्यासोबत विमानात कोण होते? याची माहिती नाहीय.

अजित पवार हे कोणत्या कंपनीच्या विमानातून प्रवास करत होते, या बद्दलही ठोस माहिती नाहीय. अजित पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. सध्या जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे.

अजित पवार हे गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. विमानतळाजवळच्या शेतात हे विमान कोसळलं. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार यांची आज बारामतीमध्ये सभा होती.

अजित पवार हे पहाटेच कामाला सुरुवात करतात ही त्यांची सवय आहे. आज देखील सकाळीच ते मुंबईहून छोट्या विमानाने बारामतीला निघाले होते. त्यांच्या आज बारामतीमध्ये चार सभा होत्या. अजित पवार हे जिल्हा परिषदेच्या जोरात तयारीला लागले होते.