
बाबा म्हणतात, केवळ पैसा कमावू नका, त्याचे व्यवस्थापन शिका. उगा खर्च करू नका. व्यसनांपासून चार हात दूर राहा. संपत्तीचा योग्य वापर करा. पैशाची उधळपट्टी टाळा.

नीम करोली बाबांच्या मते, तुमच्या अर्जित धनापैकी, कमाईपैकी काही भाग लोकांच्या मदतीसाठी नक्की वापरा. जी मदत होईल ती नक्की करा. पैशातून चांगलीच कामे करा. तुमच्या जीवनात पैसा दुप्पटीने येईल. समाधान मिळेल.

सतत इतरांशी तुलना करणे म्हणजे दुखाला आमंत्रण देणे आहे. तुमचा आनंद तुम्हीच हिरावून घेता. त्यामुळे आनंदी राहा, प्रसन्न राहा. नव्या वाटा शोधा. इतरांना चांगले ते सांगण्याचा प्रयत्न करा.

तुमची कमाई आणि तुमच्या कमकुवत बाजू इतरांना सांगूच नका. त्यामुळे लोक तुमची हेटाळणी करतील.

सर्वत्र दुख उगळण्याचा मोह टाळा, ते तुमच्यासाठी नुकसानदायक आहे.

श्रीमंतीचे प्रदर्शन करू नका. साधं आणि सोपं जगायला शिका. वायफळ बडबड आणि खर्च दोन्ही टाळा. देवाचे नामस्मरण करा. ईर्ष्या टाळा. निंदा टाळा. कोणाचे काही हिसकावू नका.