आता रद्दीवाल्यामुळं सुटणार पेपरफुटीचं कोडं? नीट प्रकरणात खळबळ उडवणारी माहिती समोर!
दरम्यान आता या नीट पेपरफुटी प्रकरणात नवी आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार लातूरमध्ये सीबीआयचे पथक पुन्हा एकदा मोटेगावकरच्या क्लासेस कार्यालयात पोहोचले.

नीट पेपरफुटी प्रकरणात रोजच नवनवे खुलासे होत आहेत. नीटचे पेपर फुटल्यामुळे तब्बल 22 लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. या पेपरफुटी प्रकरणाचा तपास सीबीआयच्या विशेष पथकाकडून केला जात आहे.

सीबीआयने आतापर्यंत या पेपरफुटीत अनेकांना अटक केली आहे. यात लातूरमधील दोन डॉक्टरांचाही समावेश आहे. आरसीसी क्लासेसचा संचालक मोटेगावकर यालाही सीबीआयने ताब्यात घेतलेले आहे.

दरम्यान आता या नीट पेपरफुटी प्रकरणात नवी आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार लातूरमध्ये सीबीआयचे पथक पुन्हा एकदा मोटेगावकरच्या क्लासेस कार्यालयात पोहोचले.

सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी मोटेगावकरच्या क्लासेसमध्ये जाऊन चौकशी आणि तपास केल्याचे बोलले जात आहे. असे असतानाच आ प्रतकणी चौकशी करण्यात आलेल्या दोन डॉक्टरांनी नीट परीक्षेनंतर नोट्स आणि काही कागदपत्र रद्दीत विकल्याचे समोर आले आहे.

त्यामुळे आता सीबीआयतर्फे रद्दी विक्रेत्यांचीही चौकशी करण्यात आल्याचे बोलले जात आहे. म्हणजेच आता रद्दी विक्रेत्यांकडून काही माहिती मिळते का, याचा सीबीआयकडून शोध घेतला जात आहे. या चौकशीतून काय पुढे येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.