Ramayana: ना रणबीर, ना यश, ना आदिनाथ कोठारे.. ‘रामायणा’तील या अभिनेत्याची तुफान क्रेझ; अक्षरश: लिहिल्या प्रेमकविता

Ramayana: बिग बजेट रामायण या चित्रपटा रणबीर आणि यशसारखे मोठे स्टार असतानाही या अभिनेत्याने त्याच्या छोट्याशा भूमिकेतून आंतरराष्ट्रीय स्तरावर चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर 'रामायण'मधील या कलाकाराची अधिक चर्चा रंगली आहे.

| Updated on: Nov 14, 2026 | 8:55 AM
1 / 6
Ramayana: सध्या बॉक्स ऑफिसवर 'रामायण' चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित या भव्य चित्रपटात रणबीर कपूर भगवान श्रीराम, साई पल्लवी सीता आणि यश रावणाच्या भूमिकेत दिसत आहेत. या कलाकारांच्या अभिनयाची आणि लूकची सर्वत्र चर्चा होत आहे. मात्र, या सगळ्यात एका अभिनेत्याने परदेशातील चाहत्यांचं विशेष लक्ष वेधून घेतलं आहे.

Ramayana: सध्या बॉक्स ऑफिसवर 'रामायण' चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित या भव्य चित्रपटात रणबीर कपूर भगवान श्रीराम, साई पल्लवी सीता आणि यश रावणाच्या भूमिकेत दिसत आहेत. या कलाकारांच्या अभिनयाची आणि लूकची सर्वत्र चर्चा होत आहे. मात्र, या सगळ्यात एका अभिनेत्याने परदेशातील चाहत्यांचं विशेष लक्ष वेधून घेतलं आहे.

2 / 6

विशेष म्हणजे, या अभिनेत्याची भूमिका चित्रपटात फार मोठी नसली तरी त्याच्या लूकवर थायलंडमधील चाहते अक्षरशः फिदा झाले आहेत. हा अभिनेता दुसरा-तिसरा कोणी नसून कुणाल कपूर आहे. त्याने चित्रपटात देवराज इंद्राची भूमिका साकारली आहे.

3 / 6

'रामायण' चित्रपटातील कुणाल कपूरचा इंद्रदेवाच्या भूमिकेतील लूक चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. त्याचा राजेशाही अंदाज, व्यक्तिमत्त्व आणि पडद्यावरील उपस्थितीने थायलंडमधील प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सोशल मीडियावर अनेक थाई चाहते त्याचे फोटो आणि चित्रपटातील दृश्ये शेअर करत आहेत. काही चाहत्यांनी तर त्याच्या सौंदर्याचं वर्णन करण्यासाठी चक्क कविताच लिहिल्या आहेत.

4 / 6

एका चाहत्याने कुणालचा फोटो शेअर करत त्याच्या सौंदर्याची तुलना स्वर्गातून पृथ्वीवर अवतरलेल्या इंद्रदेवाशी केली. त्याचा चेहरा चंद्रासारखा तेजस्वी असून तो थाई लोकांच्या स्वप्नातील इंद्र असल्याचंही या चाहत्याने म्हटलं आहे. तर दुसऱ्या एका चाहत्याने कुणालच्या देखण्या रूपाची तुलना इंद्राच्या वज्राशी केली आहे. त्याचं सौंदर्य हे एखाद्या शस्त्रापेक्षाही प्रभावी असल्याची मजेशीर प्रतिक्रिया या चाहत्याने दिली.

5 / 6

कुणाल कपूरला मिळणारं प्रेम केवळ कौतुकापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. अनेक चाहत्यांनी त्याला थायलंडमध्ये येण्याचं निमंत्रणही दिलं आहे. त्याच्या सोशल मीडिया पोस्टवर थाई चाहत्यांच्या कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडत आहे. विशेष म्हणजे, चाहत्यांच्या या प्रेमाला कुणालनेही प्रतिसाद दिला आहे. थायलंडमध्ये आपली बहीण राहत असल्याचं सांगत त्याने हा देश आपल्यासाठी दुसऱ्या घरासारखा असल्याचं म्हटलं आहे.

6 / 6

नितेश तिवारी यांच्या 'रामायण'मध्ये कुणाल कपूरने देवराज इंद्राची भूमिका साकारली आहे. चित्रपटातील सुरुवातीच्या महत्त्वाच्या प्रसंगांमध्ये तो दिसतो. असुरांचा राजा सुमाली याच्याशी युद्ध, रावणाकडून पराभव आणि भगवान विष्णूंना रावणाचा वध करण्यासाठी अवतार घेण्याची विनंती करणारा प्रसंग अशा दृश्यांमध्ये कुणाल झळकतो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us