
काल रात्री शुक्रवार 4 नोव्हेंबर 2023 ला नेपाळमध्ये मोठा भूकंप झालाय. हा भूकंप 6.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा होता. नेपाळमध्ये या भूकंपाने मोठं नुकसान झालंय.

नेपाळमध्ये एका महिन्यात तिसऱ्यांदा इतके तीव्र भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. पाळच्या जजरकोट जिल्ह्यात लामिडांडा भाग भूकंपाचा केंद्र आहे.

भारतातील दिल्ली, यूपी, बिहार उत्तर भारतातील अनेक ठिकाणी भूकंपाचे हे धक्के जाणवले. फोटोमध्ये तुम्ही बघू शकता नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालंय.

भूकंपाचे धक्के बसताच नागरिक घराच्या बाहेर धावत आले. घराचं छप्पर, भिंती सगळं काही इथे उद्धवस्त झालेलं तुम्ही बघू शकता. रात्री 11 वाजून 32 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले.

रॉयटर्स या वृत्तसंस्थेनुसार, भूकंपामुळे नेपाळमध्ये आतापर्यंत 129 नागरिकांचा मृत्यू झालाय. शेकडो लोक या भूकंपात जखमी झाले आहेत. लोकांच्या घरांचं, इतर मालमत्तेचं देखील खूप नुकसान झालंय.