AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सकाळी रिकाम्यापोटी केळं की खजूर खाणे आरोग्यासाठी ठरेल फायदेशीर, जाणून घ्या

केळी आणि खजूर हे दोन पदार्थ आहेत जे आरोग्यासाठी वरदान मानले जातात. पण तुम्हाला माहिती आहे का या दोघांपैकी कोणते आरोग्यासाठी सर्वात फायदेशीर आहे? जर नसेल तर आजच्या लेखात आपण याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.

सकाळी रिकाम्यापोटी केळं की खजूर खाणे आरोग्यासाठी ठरेल फायदेशीर, जाणून घ्या
केळं आणि खजूरImage Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Feb 17, 2026 | 3:52 PM
Share

बदलत्या जीवनशैलीत निरोगी शरीर राखण्यासाठी आपण विविध प्रकारचे पदार्थ खातो जे पौष्टिकतेचे भांडार मानले जातात. केळी आणि खजूर हे त्यापैकीच एक आहेत. परंतु कधीकधी आपल्यापैकी अनेकजण सकाळी उठल्यावर चहा किंवा कॉफीचे सेवन करतात. पण तज्ञांचा सल्ल्यानुसार जर तुम्ही सकाळची सुरूवात योग्य अन्नाने केली तर तुमची पचनसंस्था सुरळीत चालते. त्यामुळे तुम्हीही सकाळची सुरूवात ही फळं खाऊन केली पाहिजे. अशातच सकाळी रिकाम्या पोटी केळी खाणे की खजूर खाणे अधिक फायदेशीर आहे. पण सकाळी केळ्याचे आणि खजूराचे सेवन करणे फायदेशीर आहे की नाही याबद्दल बरेचजण गोंधळून जातात. जर तुम्हालाही या प्रश्नाचे उत्तर हवे असेल तर विलंब न करता आजच्या लेखात आपण केळी आणि खजूर दोन्हीही पोषणाचे फायदे आणि सकाळी रिकाम्या पोटी काय खावे ते जाणून घेऊयात.

रिकाम्या पोटी केळं खाण्याचे फायदे-

केळी हे जगभरात मोठ्या प्रमाणात सेवन केले जाणारे आणि आवडते फळ आहे. त्यात पोटॅशियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन बी6, व्हिटॅमिन सी आणि फायबरसह असंख्य पोषक घटक असल्याने ते शरीराला असंख्य फायदे देऊ शकतात. केळी हा एक उत्तम नाश्ता मानला जातो.

खजूर खाण्याचे फायदे-

खजूर हे आरोग्याचा खजिना मानले जाते कारण त्यात फायबर, पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह, अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन बी6 सारखे गुणधर्म असतात, जे शरीराला अनेक आरोग्य समस्यांपासून वाचवण्यास आणि ऊर्जा वाढविण्यास मदत करतात. खजूर अनेक प्रकारे आहारात समाविष्ट केले जाऊ शकतात, परंतु दुधासोबत त्यांचे सेवन करणे सर्वोत्तम मानले जाते.

खजूर की केळी, कोणते खाणे जास्त फायदेशीर आहे?

  • जर तुम्हाला पोटाच्या समस्या असतील तर रिकाम्या पोटी केळी खाणे टाळा. त्याऐवजी तुम्ही खजूर खाऊ शकता.
  • त्यातच तुम्हाला तुमचे वजन वाढवायचे असेल तर केळी आणि खजूर दोन्ही खाणे फायदेशीर ठरू शकते.
  • ज्या लोकांना पचनाच्या समस्या आहेत त्यांनी रिकाम्या पोटी खजूर खावेत.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
अंगद का पैर म्हणत अमित शाहांचा भाजपच्या विजयाचा विश्वास...
Amit Shah : अंगद का पैर म्हणत अमित शाहांचा भाजपच्या विजयाचा विश्वास; अखिलेश यादवांनी एका वाक्यात दिलं प्रत्युत्तर
साताऱ्यात पावसाची जोरदार बॅटिंग, शहरासह ग्रामीण भाग जलमय...
Satara Rain : साताऱ्यात पावसाची जोरदार बॅटिंग, शहरासह ग्रामीण भाग जलमय; शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद
पुर्णेकर प्रकरणावर प्रश्न विचारताच उपमुख्यमंत्री थेट.. नेमकं काय घडलं?
Eknath Shinde On Purnekar Case : पुर्णेकर प्रकरणावर प्रश्न विचारताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट...; नेमकं काय घडलं?
वाल्मिक कराड यांचा मुलगा सुशील कराड पुन्हा चर्चेत; ऑडिओ क्लिप व्हायरल
Sushil Karad : वाल्मिक कराड यांचा मुलगा सुशील कराड पुन्हा चर्चेत; पीडित महिलेला धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल
आम्ही संविधानाला संपवू देणार नाही! राहुल गांधींचा हुंकार....
Rahul Gandhi : आम्ही संविधानाला संपवू देणार नाही! राहुल गांधींचा हुंकार; संपूर्ण भाषण पाहा
नरेंद्र मोदी ज्ञानेश कुमार यांना निवडणार की देशाला? तेजस्वी यादव...
Tejashwi Yadav : नरेंद्र मोदी ज्ञानेश कुमार यांना निवडणार की देशाला? तेजस्वी यादव यांचा थेट सवाल
शेतकऱ्यांना भरघोस मदत मिळणार, सरकार वाऱ्यावर सोडणार नाही....
Eknath Shinde : शेतकऱ्यांना भरघोस मदत मिळणार, सरकार वाऱ्यावर सोडणार नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी ग्वाही
शिंदेंनी पुर्णेकर कुटुंबाला भेटायला येऊ नये, हात जोडून विनंती...
Ram Purnekar : शिंदेंनी पुर्णेकर कुटुंबाला भेटायला येऊ नये, हात जोडून विनंती; राम पूर्णेकर असं का म्हणाले?
दिवाळीच्या फराळावर FDA चा कडक पहारा; तुकाराम मुंडेंनी स्वतः तपासले...
Tukaram Munde FDA : दिवाळीच्या फराळावर FDA चा कडक पहारा; तुकाराम मुंडेंनी स्वतः तपासले लाडू-चिवडे; विक्रेत्यांना दिला इशारा
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभासाठी पुरोहित संघाची मोठी मागणी; कायमस
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभासाठी पुरोहित संघाची मोठी मागणी; कायमस्वरूपी सुरक्षा देण्याची विनंती