Govinda : प्री-वेडिंग फोटोशूट केलंय की…! गोविंदा आणि कोमलच्या फोटोंवर नेटकऱ्यांचा तीव्र संताप, म्हणाले…

Govinda : अभिनेता गोविंदा गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूडमध्ये सक्रिय नव्हता, पण आता अभिनेता 'रुपा' सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. पण सिनेमाची घोषणा केल्यापासून गोविंदा प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. कारण गोविंदाच्या अफेअरची चर्चा सिनेमातील अभिनेत्री कोमल राणी स्वर्णकार हिच्यासोबत रंगली आहे.

| Updated on: Nov 13, 2026 | 9:23 AM
1 / 5
अभिनेता गोविंदा आणि अभिनेत्रीा कोमल राणी स्वर्णकार त्यांच्या  'रुपा' सिनेमामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत आहे. आधी गोविंदाचे अभिनेत्रींसोबत अफेअर आहे आणि कोमल या नावाचा मला तिरस्कार आहे... असं वक्तव्य अभिनेत्याची बायको सूनीता अहुजा हिने केलेलं... ज्यामुळे चर्चांना उधाण आलं.

अभिनेता गोविंदा आणि अभिनेत्रीा कोमल राणी स्वर्णकार त्यांच्या 'रुपा' सिनेमामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत आहे. आधी गोविंदाचे अभिनेत्रींसोबत अफेअर आहे आणि कोमल या नावाचा मला तिरस्कार आहे... असं वक्तव्य अभिनेत्याची बायको सूनीता अहुजा हिने केलेलं... ज्यामुळे चर्चांना उधाण आलं.

2 / 5

त्यानंतर गोविंदा याला विमानतळावर आणि त्यानंतर लालबागच्या राजाच्या दर्शानासाठी कोमल हिच्यासोबत स्पॉट केल्यानंतर चर्चांना जास्तच उधाण आलं. आता देखील कोमल हिने गोविंदासोबत काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. फोटो पोस्ट करत तिने कॅप्शनमध्ये 'रूपाची सुंदर झलक' असं लिहिलं आहे.

3 / 5

कोमलची ही पोस्ट अनेकांना आवडली तर, अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, 'प्री-वेडिंग फोटोशूट आहे की सिनेमाचं शूट आहे?', दुसरा नेटकरी म्हणाला, 'सिनेमा प्रदर्शित होणार आहे की नाही.', तिसऱ्या नेटकरी म्हणाला, 'शुगर डॅडी' अशा कमेंट करत अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

4 / 5

कोमल हिने गोविंदासोबत काही रोमँटिक फोटो पोस्ट केले आहेत, जे अनेकांना आवडलेले नाही. बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत हिने देखील कोमलच्या फोटोंवर संताप व्यक्त केला आहे. राखी हिने केलेली कमेंट देखील सख्या चर्चेत आहे.

5 / 5

सांगायचं झालं तर, सुनीता आहुजा हिने अनेकदा गोविंदा याच्या विरोधात वक्तव्य केलं आहे. एवढंच नाही तर, तिने घटस्फोटासाठी अर्ज देखील दाखल केलेला. पण त्यानंतर मागे देखील घेतला. पण त्यानंतर देखील सुनीता सतत सर्वासमोर गोविंदा याच्या विरोधात बोलताना दिसते. शिवाय गोविंदा त्याच्या कुटुंबासोबत राहत नाही... अशी देखील माहिती समोर आली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us