
मधाच्या सेवनाने शरीराला मोठा लाभ होतो. यात एंटीऑक्सीडेंट तत्व असते. त्यामुळे शरीराला जीवाणूंशी लढायला ताकद मिळते. याच्या सेवनाने जखमा देखील लवकर भरतात. तसेच खोकला असेल किंवा घसा खवखवत असेल तर मधाचे चाटण दिले जाते. इम्युनिटी वाढविण्यासाठी देखील मधाचा वापर केला जातो.

मधात कधीच आंबट फळांचा रस मिक्स करु नये. आंबट फळात एसिड असते. मधात आबंट रस टाकल्यास त्याची चव खराब होते आणि त्याचा परिणाम देखील कमी होतो. मधाचे आरोग्यदायी गुण कमी होतात. तसेच पोट देखील खराब होऊ शकते. म्हणून आबंट फळाचा रस मधात टाकू नयेच..

मधात तीव्र गरम पदार्थ जसे दूध, पाणी अशा वस्तू मधात एकत्र करुन सेवन करु नये. तीव्र गरम वस्तू मधात एकत्र केली तर मधाचे पोषकतत्व निघून जाते. आणि ते शरीराला धोकादायक ठरु शकते. यातून कॅन्सरवाले पदार्थ मधातून निघू शकतात.

दुधापासून तयार झालेले कोणतेही डेअरी प्रोडक्ट मधात मिक्स करु नयते. उष्णतेने दूधाचे प्रोटीन घट्ट होऊ शकतात. त्याचा स्वाद बिघडू शकतो. त्ंयामुळे मध आणि दूधाचे पदार्थ दोन्ही खराब होऊ शकतात.म्हणून त्यांना एकत्र आणू नये..

काकडी आणि मध दोन्ही आरोग्यासाठी चांगले आहेत. परंतू या दोघांना कधी एकत्र आणू नये. आयुर्वेदानुसार दोन्हीचा गुणधर्म वेगळा आहे. मध शरीराला गरम राखण्यासाठी खाल्ले जाते. तर काकडी शरीराला थंड करण्यासाठी खाल्ली जाते. दोघांचे एकत्र सेवन पचनक्रिया बिघडवू शकते.

सर्दीत लसूण खुप गुणकारी असतो. परंतू चुकूनही लसूण आणि मध एकत्र करुन सेवन करु नये. लसूणची चव खूप तीव्र असते. त्यात एसिडचे प्रमाण जास्त असते. मधात लसूण टाकल्यास मधाची चव बिघडते आणि त्याचे पोषक तत्व निघून जाते. त्यामुळे शरीरास नुकसान होऊ शकते.