
मध: रेफ्रिजरेटरमध्ये मध ठेवल्याने ते घट्ट होते. मध नैसर्गिकरित्या जास्त काळ खराब होत नाही. त्याची चव टिकवून ठेवण्यासाठी ते थंड, कोरड्या जागी सीलबंद बरणीत ठेवा.

कांदे: रेफ्रिजरेटरमधील आर्द्रता कांद्यासाठी हानिकारक असते. त्यामुळे ते ओले आणि मऊ होतात आणि त्यात बुरशी वाढू शकते. म्हणून नेहमी कांदे चांगल्या हवेशीर ठिकाणी साठवा. तसेच, बटाटे आणि कांदे एकत्र ठेवू नका. कारण बटाटे लवकर खराब होतात.

बटाटे: बटाट्यांमधील स्टार्च थंड झाल्यावर लवकर साखरेत रूपांतरित होते, ज्यामुळे त्यांची चव आणि पोत दोन्ही बदलतात. यामुळे शिजवल्यानंतर त्यांना थोडी गोड चव येते.

लसूण: रेफ्रिजरेटरच्या तापमानामुळे लसूण लवकर खराब होतो आणि त्याची चव कमी होते. ते कोरड्या, हवेशीर जागेत, जसे की टोपली किंवा कागदी पिशवीत साठवा.

टोमॅटो: पिकलेले टोमॅटो रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्याने त्यांची चव कमी होऊ शकते आणि ते मऊ किंवा दाणेदार होऊ शकतात. म्हणून ते थंड, हवेशीर जागेत ठेवा. जेणेकरून ते नैसर्गिकरित्या पिकू शकतील. म्हणून जर तुम्ही या वस्तू रेफ्रिजरेटरमध्ये ठेवत असाल तर त्या बाहेर ठेवण्याचा विचार करा.