
अग्नीच्या शोधामुळे माणसाने खूप प्रगती केली. माणसाच्या उत्क्रांतीच्या काळात अग्नीला विषेश महत्त्व प्राप्त झाले. शास्त्रात तर अग्नीला देवाचा दर्जा दिला आहे. आजही कोणतेही शुभ काम कराण्या आधी यज्ञाद्वारे शुद्धी केली जाते. अशा स्थितीत अग्नी अत्यंत पवित्र मानला जातो. म्हणूनच अग्नीला कधीही पाय लावू नये. अग्नीचा अपमान करणे हा देवतांचाअपमान मानला जातो. दुसरीकडे, आग भयंकर असेल तर ती कोणालाही नष्ट करू शकते. म्हणून अग्नी पासून दोन हात लांब राहणंच योग्य.

शास्त्रात गुरु आणि ब्राह्मण हे आदरणीय मानले गेले आहेत. त्यांच्याकडून आपल्याला ज्ञान मिळते. त्यांच्या चरणांना स्पर्श करून तुम्ही आशीर्वाद घेऊ शकता. त्यांच्यावर पाय किंवा लाथ मारण्याची चुक कधीही करु नका. हा त्यांचा अपमान मानला जातो.

शास्त्रात मुलीला देवीचे रूप मानले आहे. त्याचबरोबर लहान मुले यांना भगवंताचे रूप म्हटले जाते. याशिवाय ज्येष्ठांना आदरणीय मानले जाते. त्यामुळे त्यांचा आदर करावा आणि त्यांचा आशीर्वाद घ्यावा. त्यांना लाथ किंवा पाय मारण्याची चुक करू नका यामुळे तुम्हाला वाईट परिणाम भोगावे लागतात.

हिंदू धर्मात गाईला पूजनीय मानले गेले आहे. गायीमध्ये ३३ कोटी देव असतात अशी मान्यता आहे. पुराणातील देवांच्या चित्रांमध्ये आपल्याला गोमाता पाहायला मिळते. त्यामुळे तील पाय मारणे म्हणजे देवांचा अपमान करण्यासारखे आहे.