
जान्हवी कपूर ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. जान्हवी कपूर ही अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नात धमाका करताना दिसली.

जान्हवी कपूर ही सध्या तिच्या उलझ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त दिसत आहे. नुकताच जान्हवी कपूर हिने घातलेला ड्रेस पाहून लोक हैराण झाले.

जान्हवी कपूरने पांढऱ्या आणि काळ्या रंगाचा ऑफ शोल्डर ड्रेस घातला. ज्यावर समोरच्या बाजूला ब्लेझर डिझाइन आहे, लोकांना जान्हवीचा हा ड्रेस आवडला नाहीये.

लोक या ड्रेससाठी जान्हवी कपूरची खिल्ली उडवताना दिसत आहेत. अनेकांना तर जान्हवी कपूरचा हा ड्रेस पाहून चक्क उर्फी जावेदची आठवण झालीये.

जान्हवी कपूर आणि उर्फी जावेद दोघी बहिणी असल्याचे अनेकांनी म्हटले आहे. जान्हवी कपूरचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत.