भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणानंतर गावकऱ्यांचा मोठा निर्णय, बचत गटाच्या महिलांचा ठराव
भोंदूबाबा अशोक खरात याने अनेक महिलांचं शारीरिक शोषण केलं आहे. तर अनेक उद्योजकांना देखील फसवलं आहे... त्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे... भोंदूबाबाचा खरा चेहरा समोर येताच गावकऱ्यांनी मोठी निर्णय घेतला आहे... बचत गटाच्या महिलांना एकत्र येत मोठा निर्णय घेतला आहे.

नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात चे प्रकरण समजल्यानंतर सर्वच स्तरातून तीव्र संताप, प्रचंड चीड, क्रोध व्यक्त केला आहे. दरम्यान, निमगुळ तालुका धुळे येथील बचत गटाच्या महिलांनी देखील भोंदूबाबांविरोधात मोठा निर्णय घेतला आहे.

अनिसचे जिल्हा पदाधिकारी दिलीप खिवसरा यांनी महिलांना भोंदू आपल्या घरात कधी येऊ नये यासाठी जादूटोणाविरोधी कायद्याची पुस्तकाचे वाटप केले, जर असे प्रकार आढळल्यास जादूटोणाविरोधी कायद्याने महिलांनी धाडस दाखवून गुन्हा नोंदवावा... असं देखील महिलांना सांगण्यात आलं आहे.

जो व्यक्ती चमत्काराचे दावे करतो, कर्मकांडाच्या नावाखाली तुमचे भविष्य बदलून देण्याचे आश्वासन देतो, जो लोकांकडून मोठ्या प्रमाणात पैसा गोळा करतो किंवा हात पहाणे, कुंडली जुळवणे, अंकशास्त्र, राशिफळ, ग्रह शांती, रत्न खडे, वस्तू दोष नावाखाली फसवणूक करतो, तो आध्यात्मिक गुरू नसून भोंदूच असतो अशी माहिती अनिसचे जिल्हा पदाधिकारी दिलीप खिवसरा यांनी महिलांना दिली.

यावेळी सिंधुबाई मोरे, आशाबाई पाटील, विद्याबाई पाटील, जनाबाई मोरे, ताराबाई पाटील, संगीता मोरे आदी महिला उपस्थित होत्या. महिलांनी एकत्र येत भोंदू बाबांना गावबंदी, घरात बंदी... असा निर्णय घेतला आहे... सांगायचं झालं तर, गेल्या काही दिवसांपासून भोंदूबाबा प्रकरण अधिक तापलं आहे.

सध्या अशोक खरात प्रकरणी पोलीस अधिक चौकशी करत असून रोज नवीन आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे. पोलिसांनी खरात याच्या मुलाची देखील चौकशी केली. ज्यामध्ये त्याने बापाबद्दल धक्कादायक खुलासे केले आहे. पण आता तो फरार आहे... एवढंच नाही तर, खरात याची पत्नी देखील फरार असून, पोलीस त्यांच्या शोधात आहेत.