जग संकटात? चीनला जाण्याआधी हुकुमशाहा किम जोंग उनचं मोठं पाऊल, टेन्शन वाढलं!

उत्तर कोरियाचा हुकुमशाहा किम जोंग उन कधी काय करेल याचा नेम नाही. किम जोंग याने याआधी जगाला अचंबित करून टाकणारे निर्णय घेतलेले आहेत. असे असतानाच आता एक नवी माहिती समोर आली आहे.

| Updated on: Sep 01, 2025 | 9:32 PM
1 / 5
उत्तर कोरियाचा हुकुमशाहा किम जोंग ऊन कधी काय निर्णय घेईल हे सांगता येत नाही. त्यांनी याधी घेतलेल्या काही निर्णयांचे परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागलेले आहेत असे असतानाच आता एक मोठी माहिती समोर येत आहे.

2 / 5
मिळालेल्या माहितीनुसार लवकरच किम जोंग ऊन तब्बल सहा वर्षांनंतर चीनच्या दौऱ्यावर जाणार आहेत. बुधवारी म्हणजेच 3 सप्टेंबरमध्ये बिजिंगमध्ये होणाऱ्या लष्कराच्या संचालनाला ते उपस्थित राहतील. चीनच्या या कार्यक्रमात एकूण 26 परदेशी नेते सहभागी होतील. यात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांचाही समावेश असेल.

3 / 5
चीनला जाण्याआधी किम जोंग उन यांनी थेट लष्करासाठी शस्त्र बनवणाऱ्या कारखान्याची पाहमी केली आहे. या कारखान्यात जाऊन त्यांनी या शस्त्रांचे निरीक्षण केले आहे.  या कारखान्यात काही क्षेपणास्त्रांचीही निर्मिती केली जाते.

4 / 5
भविष्यात अशा प्रकारच्या क्षेपणास्त्रांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन व्हावे, यासाठी किम जोंग उन प्रयत्नशील आहेत. चीनला जाण्याआधी याच कारखान्याला त्यांनी भेट दिली आहे. याबाबतचे वृत्त उत्तर कोरियाची अधिकृत वृत्तसंस्था कोरियन सेंट्रल न्यूज एजन्सीने दिले आहे. किम जोंग उन यांनी रशिया-युक्रेन युद्धात रशियाची बाजू घेतलेली आहे.

5 / 5
दक्षिण कोरियाच्या आरोपानुसार उत्तर कोरियाने रशियाला अनेक बॅलेस्टिक मिसाईल्स तसेच इतर शस्त्र पुरवलेले आहेत. असे असतानाच आता पुन्हा एकदा किम जोंग उन यांनी आपल्या शस्त्रांची निर्मिती करणाऱ्या कारखान्याला भेट दिल्यामुळे जगाची चिंता वाढली आहे. भविष्यात काही वेगळं तर होणार नाही ना? असा सवाल उपस्थित केला जात आहे.