अमिताभ नाही तर या लग्न झालेल्या अभिनेत्याच्या प्रेमात वेडी होती रेखा, ब्रेकअपनंतर विना चपल रस्त्यावर धावलेली

अमिताभ बच्चन नाही तर या लग्न झालेल्या अभिनेत्याच्या प्रेमात होती रेखा. एकत्र दिलेत अनेक चित्रपट. ब्रेकअप होताच विना चपल मुंबईच्या रस्त्यांवर धावलेल्या रेखा.

| Updated on: Jun 23, 2026 | 1:04 PM
1 / 6
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री रेखाच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेकदा चर्चा रंगत असते. अमिताभ बच्चन यांच्यापासून दूर झाल्यानंतर 1980 च्या दशकात तिचे नाव अभिनेता राज बब्बर यांच्यासोबत जोडले गेले होते. आता अनेक वर्षांनंतर या कथित नात्याची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

2 / 6
1986 मध्ये प्रसिद्ध अभिनेत्री स्मिता पाटील यांचे बाळंतपणादरम्यान निधन झाले होते. या धक्क्यामुळे राज बब्बर खचून गेले होते. दुसरीकडे, रेखादेखील त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील कठीण काळातून जात होत्या. अशा परिस्थितीत दोघेही एकमेकांच्या जवळ आल्याचे त्या काळात बोलले जात होते.

3 / 6
रेखा आणि राज बब्बर यांनी ‘अगर तुम न होते’, ‘संसार’ आणि ‘इन्साफ की आवाज’ यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. चित्रपटांच्या शूटिंगदरम्यान त्यांच्यातील मैत्री अधिक घट्ट झाली आणि त्याचे रूप कथित प्रेमसंबंधात बदलल्याच्या चर्चा रंगल्या.

4 / 6
रेखा यांनी या नात्याबाबत कधीही सार्वजनिकरीत्या भाष्य केले नाही. मात्र, एका जुन्या मुलाखतीत राज बब्बर यांनी रेखांसोबतच्या जवळिकीबाबत संकेत दिले होते. कठीण काळात दोघांनी एकमेकांना भावनिक आधार दिल्याचे त्यांनी सांगितले होते. तसेच, रेखांसोबत घालवलेले काही क्षण आयुष्यात कधीही विसरता येणार नाहीत, असेही त्यांनी म्हटले होते.

5 / 6
दरम्यान, काही माध्यमांतील वृत्तांनुसार या कथित नात्याचा शेवट अत्यंत नाट्यमय पद्धतीने झाला होता. राज बब्बर यांनी त्यांच्या पहिल्या पत्नी नादिरा बब्बर यांच्याकडे परतण्याचा निर्णय घेतल्याने रेखा नाराज झाल्याचे सांगितले जाते. याच कारणावरून दोघांमध्ये मुंबईतील एका रस्त्यावर वाद झाल्याची चर्चा होती.

6 / 6
त्या वादानंतर रेखा चप्पल काढून अनवाणी रडत धावत गेल्याची अफवा अनेक वर्षे बॉलिवूडमध्ये चर्चेचा विषय ठरली. मात्र, या घटनेबाबत रेखा यांनी नेहमीच नकार दिला असून असे काही घडले नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे या दाव्यांना अधिकृत पुष्टी मिळालेली नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us