फक्त ‘मास्टरशेफ’ कुणालच नाही तर ‘या’ सेलिब्रिटींनाही पत्नीच्या क्रूरतेच्या आधारावर मिळाला घटस्फोट

| Updated on: Apr 05, 2024 | 11:25 AM

'मास्टरशेफ' फेम कुणाल कपूर त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला. पत्नीच्या क्रूरतेच्या आधारावर दिल्ली हायकोर्टाने त्याला घटस्फोट मंजूर केला. त्यानंतर अशा काही सेलिब्रिटींची नावं चर्चेत आहेत, ज्यांना याआधीही पत्नीच्या क्रूरतेच्या आधारावर कोर्टाने घटस्फोट मंजूर केला आहे.

1 / 5
'मास्टरशेफ' फेम कुणाल कपूरला मंगळवारी दिल्ली हायकोर्टाने पत्नीपासून घटस्फोटाला मंजुरी दिली आहे. क्रूरतेच्या आधारावर कोर्टाने हा निकाल दिला. पत्नीने कधीच माझ्या आईवडिलांचा आदर केला नाही, माझा सतत अपमान केला.. असे आरोप कुणालने केले होते.

2 / 5
फक्त शेफ कुणार कपूरच नाही तर पत्नीच्या क्रूरतेच्या आधारावर याआधी इतरही काही सेलिब्रिटींना कोर्टाने घटस्फोटाला मंजुरी दिली. भारतीय क्रिकेटर शिखर धवनने पत्नी आयेशाला लग्नाच्या दहा वर्षांनंतर घटस्फोट दिला.

3 / 5
शिखर धवनने त्याच्या पत्नीवर आरोप केले होते की तिने मानसिकदृष्ट्या खूप त्रास दिला. मुलाशी भेटू देत नसल्याचाही आरोप शिखरने केला होता. आरोप सिद्ध झाल्यानंतर शिखरने घटस्फोटाची केस जिंकली होती. शिखरच्या बाजूने काही सेलिब्रिटींनीही पोस्ट लिहिली होती.

4 / 5
प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता जॉनी डेप त्याच्या घटस्फोटामुळे जोरदार चर्चेत होता. ॲम्बर हर्डने जॉनीवर मारहाणीचा आणि अत्याचाराचा आरोप केला होता. मात्र त्यानंतर खुद्द जॉनीने ॲम्बरवर शोषणाचा आरोप केला. कोर्टातील सुनावणीदरम्याने बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. घटस्फोटाची ही केस जॉनीने जिंकली होती आणि केस हरल्यामुळे ॲम्बरला एक दशलक्ष डॉलर भरावे लागले होते.

5 / 5
या यादीत अभिनेता सैफ अली खानचाही समावेश आहे. सैफने त्याची पहिली पत्नी अमृता सिंहच्या वागण्याला कंटाळून घटस्फोट दिला होता. अमृताने सतत आई आणि बहिणीचा अपमान केला, असा आरोप सैफने केला होता.